लातूर ऑफिसर क्लब’च्या चमूचे समुद्रखाडी जलतरण स्पर्धेत यश
लातूर, दि. 25 (जिमाका) : विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय समुद्रखाडी जलतरण स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लबच्या चमूने यश मिळविले. या स्पर्धेत क्लबचे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी दोन विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्पर्धा पूर्ण केली.
अभय देवकते याने तीन किलोमीटर अंतर 41 मिनिट 13 सेकंदात, तर अलोक मंठाळे याने हेच अंतर 42 मिनिटे 35 सेकंदात पूर्ण केल. या दोन्ही विद्यार्थ्यांना विजयदुर्ग येथे प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
ऑफिसर्स क्लब संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत, क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि क्लबचे सचिव तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी या चमूचे अभिनंदन केले. दोन्ही विद्यार्थ्यांचा लातूर ऑफिसर क्लबचे गोल्ड मेंबर शिवराज मोटेगांवकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ऑफिसर क्लब गोल्ड मेंबर तथा क्लब खजिनदार डॉ. विश्वास कुलकर्णी, क्रीडा समिती प्रमुख अजित भुतडा, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत साळुंखे, डॉ. सुधाकर सुडे, डॉ. राहुल सूळ, डॉ. दत्ता आंबेकर, अनंत कासारखेडकर, संताजी रेड्डी, सुजित बिराजदार, ऍड. औदुंबर मंठाळे, रविकुमार देवकते, राजेंद्र जगताप, क्लब व्यवस्थापक अनिल जैन, सुनिल गवारे आदी उपस्थित होते.
*****
--