गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राज्य उत्पादन शुल्क विभागाची निलंगा येथे अवैध ढाब्यांवर धडक कारवाई
लातूर/निलंगा
राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री. प्रदीप पवार साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक श्री. केशव गो. राऊत, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८/९/२०२२ रोजी मे. हॉटेल आराध्या, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर येथे नोंदविलेल्या अवैध मद्याचा गुन्हा नोंदविण्यात आला त्यामध्ये एकूण १० इसमांना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये रु. ३९९५/- (रु. ३९९५/-) रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये हॉटेल व मद्यपींवर कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना दि. ९/११/२०२२ रोजी मे. न्यायालय, निलंगा येथे हजर केले असता ढाबा मालक यांना रु. २५०००/- व इतर मद्यपींना रु. १०००/- प्रत्येकी दंडा आकारण्यात आला असा एकूण रु.३४,०००/- दंड आकारण्यात आला.
सदरच्या कारवाईमध्ये अधीक्षक , लातूर - श्री. केशव राऊत, निरीक्षक-उदगीर विभाग श्री. आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक श्री. स्वप्नील काळे, श्री. अ. ब. जाधव, श्री. एल. बी. माटेकर, श्री. ए. के. शिंदे, व सहाय्यक दुय्यम निरीक्षक- श्री. गणेश गोले, श्री. ए. एल. कारभारी, जवान - श्री. अनिरुद्ध देशपांडे, श्री. हनमंत मुंडे, श्री. संतोष केंद्रे, श्री. सुरेश काळे, श्री. श्रीकांत साळुंके, श्री. ज्योतीराम पवार यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री तसेच मद्यपी व अवैध हॉटेल/धाबा विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे श्री. केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.