888
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची आ. कराड यांनी घेतली सदिच्छा भेटलातूर दि.०८ - राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी भेट घेऊन विविध विकास कामावर सविस्तर चर्चा केली. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आ. रमेशअप्पा कराड यांच्यात झालेल्या चर्चेतून विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. ही भेट अनेक विकास कामांना मान्यता आणि गती देण्यासाठी फायदेशीर ठरली असून यावेळी भाजपाचे लातूर शहर माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, केज भाजपाचे रमाकांतबापू मुंडे, रेणापूर येथील माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, महेंद्र गोडभरले, दिपक वांगस्कर, राहुल पाटील यांच्यासह अनेक जण होते.
888