Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती सोबतच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक: प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती सोबतच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक:  प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये

















लातूर:- माझं लातूर परिवार आणि प्रादेशिक परिवहन विभाग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्मरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथे अपघात विषयक जनजागृती मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.

रस्ते अपघातात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात जागतिक स्मरण दिन पाळला जातो. रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती सोबतच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक मनोज लोणारी यांनी केले तर शितल गोसावी यांनी रस्ते अपघाताची तीव्रता आणि गंभीरता या विषयावर विस्तृत आकलन करून स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या हितासाठी वाहतूक नियमांचे पालन सर्व नागरिकांनी करावे असे भावनिक आवाहन केले. माझं लातूर परिवाराचे सदस्य तथा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद कलमे यांनी अपघातामुळे होणाऱ्या गंभीर शारीरिक परिणामांवर यावेळी प्रकाश टाकला. हेल्मेट, सीटबेल्ट याचा वापर, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून आपण अपघात टाळू शकतो असे मत शहर वाहतूक पोलीस उप निरीक्षक आवेज काझी यांनी यावेळी व्यक्त केले. 
याप्रसंगी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून रस्ते वाहतूक नियम पाळण्याची शपथ उपस्थित नागरिकांना सामुहिकरित्या देण्यात आली. 
या शिबिरात सहायक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक, माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, अभय मिरजकर, प्रमोद गुडे, संजय स्वामी, जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, काशीनाथ बळवंते, रत्नाकर निलंगेकर, विष्णू आष्टीकर, के वाय पटवेकर, लिंबराज पन्हाळकर, तम्मा पावले, श्रीराम जाधव, श्याम तोष्णीवाल, योगेश शिंदे, जगदीश स्वामी, व्यंकट माने, गोविंद हेड्डा, नितीन भाले, शिवाजी कांबळे यांच्यासह अनेक वाहन चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post