Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठी "दक्षता जनजागृती सप्ताहाचे” आयोजन

भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठी   "दक्षता जनजागृती सप्ताहाचे” आयोजन 





लातूर प्रतिनिधी:-

दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता ला.प्र.वि. लातुर कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ला.प्र.वि. लातुर विभागाचे पोलिस उप अधीक्षक पंडित रेजितवाड, यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा घेतली प्रतिज्ञा घेतल्यानंतर मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचुन दाखविण्यात आली. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे शिक्षण उपसंचालक, लातूर श्री. डॉ. गणपतराव मोरे, यांचे हस्ते जनजागृती सप्ताहा निमित्त तयार करण्यात आलेल्या स्टिकर्स चे विमोचन करून लातुर जिल्हयातील सर्व तालुक्यात फिरविण्यात येणाच्या जनजागृती रथास हिरवा झेंडा दाखवुन "दक्षता जनजागृति सप्ताहाची" सुरवात केली.

तसेच जनजागृती सप्ताहा निमित्त तयार करण्यात आलेली ऑडिओ क्लिप जनजागृती रथ, लातूर शहर वाहतूक विभाग व प्रादेशिक मोटार परिवहन विभागाचे व्हॅन व लातूर शहरात चालणारे अँटोरिक्षा यांना जनजागृती सप्ताहा निमित्त तयार करण्यात आलेल्या स्टिकर्स चिटकावून लातूर शहरातील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली.

कोणताही राज्य शासनाचा अधिकारी कर्मचारी लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचार करताना आढळल्यास तकार कोठे करावी याबाबत नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने जनसामान्यांपर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती व्हावी, लोकांचा सहभाग वाढावा या करीता दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिनांक ३१/१०/२०२२ ते दिनांक ०६/११/२०२२ रोजी दरम्यान "दक्षता जनजागृति सप्ताह" चे आयोजन करण्यात आले आहे. लाचखोरीची अथवा भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांना कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम ( एजेंट) कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.असे आवाहन ला.प्र.वि. लातुर पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड यांनी केले आहे.

-संपर्क-

डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड मोबाईल नंबर – ०९६२३९९९९४४ -

पंडीत रेजितवाड पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि लातूर 
मोबाईल नंबर ०९३०९३४८१८४ ला. प्र. वि. कार्यालय दुरध्वनी - ०२३८२-२४२६७४ @ टोल फ्री क्र. १०६४
Previous Post Next Post