Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आयकर अधिकारी आहे म्हणून भर दिवसा १० लाख रूपये लुटले

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आयकर अधिकारी आहे म्हणून भर दिवसा १० लाख रूपये लुटले

लातूर: लातूर शहरामध्ये सध्या चोरी,दरोड्यांचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. आतापर्यंत लातूर शहरात काही वेळा भामटे आम्ही पोलीस आहोत असे भासवून नागरिकांना लुटत होते. पण, या घटनेमध्ये चोरट्यांनी आम्ही आयकर अधिकारी आहोत म्हणून दिवसाढवळ्या १० लाख रूपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याप्रकरणी शहरभर उलट सुलट चर्चा चालू आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार लातूर येथील मयूरबन नावाने असलेल्या उच्चभूंच्या सोसायटीत सोमवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये दोघांनी प्रवेश करून आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. घरात पैसे कोठे आहेत हे शोधण्याची आमच्याकडे मशीन आहे.कोणालाही फोन करायचा प्रयत्न करू नका असे म्हणून त्या भामट्यांनी सरळ बेडरूममधील कपाटातून ५०० रूपयांच्या नोटा असलेले रोख १० लाख रूपये घेवून पोबारा केला. घरातील १० लाख रूपये कुटुंबियांच्या नजरेसमोरून डोळ्यादेखत घेवून गेल्याने लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे
 या प्रकरणी फिर्यादीयांच्या सागण्यावरून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Previous Post Next Post