गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादाच्या भोवर्यात; बदनाम संस्थेच्या अधिवेशनाला २५लाखाची मदत देण्याची घोषणा
मुंबई-पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आले होते.या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी पत्रकार परिषद या संस्थेवर प्रशासक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी पत्रकार परिषद या संस्थेच्या कार्यक्रमात संस्थेला दर अधिवेशनाला 25 लाखाची मदत जाहीर करण्यात आली खरी परंतू आता हि मदत जाहिर करुन ते आता वादाच्या भोवर्यात सापडले असून मराठी पत्रकार परिषद या बदनाम संस्थेवर प्रशासक असताना या कार्यक्रमात संस्थेला अधिवेशनाला 25 लाखाची मदत जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा धक्कादायक माहिती पत्रक काढून प्रसिद्ध कार्टूनिस्ट प्रशांत पद्माकर आष्टीकर, मुंबई यांनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे.तसेच या सदर संस्थेवर खंडणीचे तसेच शासकीय पैशाचा अपहार केल्याचे खटले दाखल असून या बोगस संस्थेचा विश्वस्त एस एम. देशमुख आणि त्याची बायको शोभना देशमुख यांनी ट्रस्ट स्थापन करून यापूर्वीही शासकीय देणग्या उकळल्या असल्याचे स्पष्ट केले असुन त्याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी मा. उद्धव ठाकरे साहेब मुंबई..,मुख्य सचिव महाराष्ट्र शासन.,पोलीस महासंचालक साहेब मुंबई,मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.यांच्याकडे करण्यात आल्याने सर्व पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहि हंडीच्या प्रकरणांनंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले असल्याची जोरदार चर्चा होवू लागली आहे.