गुन्हेगुगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून
![]() |
मयत-नंदीनी |
लातूर-लातूर शहरामध्ये वासणगाव शिवारात सैलानी बाबा मंदीराजवळ एका महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हा खून ईतका भयंकर होता कि दगडाने चेहरा पुर्ण विद्रुप करण्यात आला होता
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार मयत महिला नंदिनी विजय पारखे हि कुंभार गल्ली येथे आत्यास भेटन्यासाठी म्हणुन गेली,त्यानंतर आत्या एक भाभी आणी मयत नंदीनी हे तिघेजण सैलानी बाबा मंदीराजवळ गेले.तेथे भाभीने वासणगाव शिवारात राहणार्या मदन नामक व्यक्तीस बोलावून घेतले त्याच्या सोबत गाडीवर बसून मयत नंदीनी निघून गेली,परंतू बराच वेळ झाल्यानंतरही ती वापस आली नसल्याने आत्याने मयत नंदिनीच्या मुलास हि माहिती सांगीतली ,मुलाच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. लातूर ग्रामिण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी खुन करण्यात आलेल्या वस्तू,दोन ग्लास,एक बियरची बाॅटल जप्त करण्यात आली आहे.पुढील तपास लातूर ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक गणेश कदम करत आहेत