Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

लातूर, दि. 15(जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासह सदस्य निवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे निश्चित केली आहेत.

 राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहापासून सुरु होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
888

मतमोजणीसाठी निश्चित केलेली तालुकानिहाय ठिकाणे-

लातूर - शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर, 

औसा - प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय परिसर, औसा, 

रेणापूर- तहसील कार्यालय, रेणापूर (तळ मजला), 

चाकूर- महसूल हॉल, तहसील कार्यालय, चाकूर,

अहमदपूर- औद्योगीक प्रशिक्षण संस्था, अहमदपूर,

उदगीर- तहसील कार्यालय, उदगीर (पहिला मजला) मिटिंग हॉल,

निलंगा- औद्योगीक प्रशिक्षण संस्था, निलंगा,

जळकोट- बैठक हॉल, तहसील कार्यालय जळकोट,

देवणी- सभागृह, तहसील कार्यालय, देवणी,

शिरुर अनंतपाळ- सभागृह तहसील कार्यालय, शिरुर अनंपाळ.
Previous Post Next Post