गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गोडाऊन फोडून चोरी केलेल्या तुरीच्या कट्ट्यासह 5 आरोपींना अटक. 07 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दी मधील चिंचोलीराववाडी परिसरात असलेल्या एका गोदाम मध्ये साठवून ठेवलेले तुरी 26 कट्टे चोरीला गेल्याची तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 769/2022 कलम, 457 380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान दिनांक 26/ 12 / 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे
1) योगेश कृष्णा मोरे, वय 21 वर्ष, राहणार स्वराज्य नगर वसवाडी, लातूर.
2) विवेक अशोक हनमंते, वय 22 वर्ष, राहणार खडक हनुमान, लातूर.
3) तानाजी गोरोबा आतकरे, वय 20 वर्ष, राहणार स्वराज नगर, वसवाडी, लातूर.
4) आकाश उर्फ सुरज पंडितराव लोमटे, वय 24 वर्ष ,राहणार स्वराज्य नगर वसवाडी, लातूर.
5) आकाश भालचंद्र सुरवसे, वय 23 वर्ष, राहणार खडक हनुमान, लातूर.
यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदर गोदामची डुप्लिकेट चावी बनवून गोदाम मध्ये साठवून ठेवलेल्या धान्यापैकी तुरीचे प्रत्येकी 50 किलो वजनाचे 26 कट्टे त्यांच्या चार चाकी व दुचाकी वाहनावरून चोरून नेल्याचे कबूल केले. व वरील आरोपीतापैकी आकाश लोमटे याच्या घरी ठेवलेले गोदाम मधून चोरलेले 26 तुरीचे कट्टे, गुन्ह्यात वापरलेले एक स्विफ्ट डिझायर कार, दोन मोटरसायकल असा एकूण 07 लाख 56 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद आरोपींना पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे एमआयडीसीच्या ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डाके हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कुशलतेने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य सहाय्यक फौजदार संजय भोसले,पोलीस अमलदार सुधीर कोळसुरे राम गवारे, योगेश गायकवाड, सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.