6 डिसेंबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गाव येथे झाला. भिमाबाई आणि रामजी सपकाळ यांचे ते चौदावे पुत्र होते डॉक्टर भीमराव आंबेडकर महार जातीचे होते त्याचे आजोबा व वडिल ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते.त्या दिवसात सरकारने सर्व कर्मचारी आणि त्यांची मुले शिक्षित असावी यासाठी विशेष शाळा चालविल्या त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण मिळू शकले.जे की जातिव्यवस्थेमुळे त्यांना नाकारले गेले असते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक, महान कायदेपंडित, पत्रकार,लेखक, समाजशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ , इतिहासकाल तत्वज्ञानी, मानववंशशास्त्रज्ञ, पाली,बौद्ध ,संस्कृत, हिंदी,साहित्याचे अभ्यासक, राजनीती तज्ञ ,संसदपटू विज्ञानवादी, जलतज्ञ समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शेतकरी, कामगारांचे मानवी हक्कांचे शोषितांचे कैवारी. त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे. असंख्य सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांवर मात करून ते भारतातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे पहिले अस्पृश्य बनले भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यता आणि जातीभेद सामाजिक दृष्ट्या त्या नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय होता संपूर्ण आयुष्यभर ते दलित आणि इतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढले. आंबेडकर म्हणत "फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणूसकी कडे,शरीराला श्रमाकडे, नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो."1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन या प्रख्यात महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी संपादन केले 1913 मध्ये त्यांनी आपले वडील गमावले आणि त्याच वर्षी त्यांना बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला त्यांनी या संधीचे सोने करत स्वतःला अभ्यासात बुडवून घेतले कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयाचे अध्ययन केले. 1915 मध्ये त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून घेण्याची पदवी मिळवली. आंबेडकर हीक बुद्धिजीवी व्यक्ती होते व " बुधिमातेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे" असे त्यांचे म्हणणे होते. अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात आल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली बडोद्याच्या महाराजांनी आंबेडकर यांची राजकीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती महार असल्याकारणाने कोणीही तेथे त्यांचे काम ऐकत नसेल व त्यांच्या आज्ञा पाळत नसे एक अधिकारी असून सुद्धा तेथील कर्मचारीसुद्धा त्यांचा अपमान करत असे. 1917 मध्ये आंबेडकर मुंबईला परतले राजश्री शाहू महाराज यांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. शाहू महाराज हे स्वतः मुंबईला आंबेडकर यांच्या घरी येऊन भेटले आणि त्यांनी या वृत्तपत्रासाठी अडीच हजार रुपयांची मदत त्यांना केली होती. या वृत्तपत्रातील पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता त्यांनी आपल्या लेखातून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते त्यानंतर बहिष्कृत भारत हे साप्ताहिक समाजामध्ये जागृती घडून आणण्यासाठी सुरू केले त्यांच्या या अंकांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत होता त्याचाच परिणाम ठिकाणी त्यांचे अनुयायी सभा व परिषदा घेऊन लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत होते. अस्पृश्य लोक आपल्या हक्काच्या मागण्यांचे पत्र ब्रिटिश सरकारला पाठवत होते. 21 मार्च व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराज यांची विशेष उपस्थिती होती आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांचा उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांची व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांचा उद्धराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजश्री शाहू महाराजांचा गौरव आंबेडकर यांनी केला. शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉक्टर आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचा ही उद्धार करतील. अस्पृश्यांची राजकीय व सामाजिक हक्क त्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता त्यांचा विचारानुसार " कोणत्याही समजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते"...... बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 9 मार्च 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेच्या स्थापना केली व स्वतःला त्या संस्थेचे अध्यक्ष बनवले संस्थेची ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी शिका संघटित व्हा व संघर्ष करा या क्रियावाचक संज्ञांचे शब्द स्वीकारण्यात आले व पुढे जाऊन हेच शब्द त्यांचे घोषवाक्य झाले... शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा.. सामाजिक व राजकीय दृष्ट्या उपेक्षित असलेल्या तळागाळातील समाजाला मुख्य प्रवाहात आणणे या सभेचे ध्येय होते या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांन मध्ये स्पृश्य व अस्पृश्य समाजाच्या व्यक्तींचा समावेश होता.
आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्यतेचा चा सामना करावा लागला इसवी सन 1935 ते 36 या कालावधी दरम्यान लिहिलेल्या Waiting for visa या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यता व त्यासंबंधी त्यांना आलेल्या कटू अनुभव याच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. राजकीय स्वातंत्र्य आधी की की सामाजिक सुधारणा हा वाद आंबेडकरांच्या मनात चालू होता स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्य करण्याला अधिक प्राथमिकता दिली.ते त्यांचं अस म्हणन होत की"अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो" बाबासाहेब आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाची हक्क इसवी सन 1919 पर्यंत मिळालेले नव्हते पण ज्या वेळी साऊथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी 27 जानेवारी 1919 रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1919 बाबत अधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे 50 पृष्ठाचे छापील निवेदनही सादर केले त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे त्यांना निवडणुकीस उभे राहता आले पाहिजे त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजे या सारख्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्य वर्गीय समाजसेवक व पुढारी सहभाग घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले . त्यांच्या मतानुसार चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते.... त्यांच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते.... एकट पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते....
1931 मध्ये लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले तेथे त्यांनी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार देण्याच्या प्रश्नावर गांधीजी शाब्दिक वाद घातला. जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची सहमती दर्शवली आणि स्वतंत्र मतदार संघाची घोषणा केली तेव्हा गांधीजी यांनी सन 1932 मध्ये पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगात असताना आमरण उपोषण सुरू केले.हे उपोषण म्हणजे अस्पृश्यांना त्यांचे राजकीय अधिकार नाकारण्यासाठी आणि त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मिळू नये यासाठी घडवून आणलेली नोटंकी आहे आहे अशी नंतर आंबेडकर यांनी टीका केली.
लोकप्रियता वादग्रस्त विचार आणि गांधीजी आणि काँग्रेस यांच्यावर तीव्र टीका असूनही आंबेडकर हे प्रतिष्ठित कायदेतज्ञ आणि विद्वान होते 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन सरकारने त्यांना देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम पाहण्यासाठी आमंत्रित केले जे त्यांनी स्वीकारले 29 ऑगस्ट रोजी त्यांची संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली . भारताचे संविधान हा भारताचासर्वोच्च व पायाभूत कायदा आहे मसुदा तयार करण्याच्या कामासाठी त्यांनी त्यांचे सहकारी आणि समकालीन निरीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवली या कार्यात आंबेडकरांच्या प्रारंभिक बौद्धकालीन संघ प्रथेचा अभ्यास आणि त्यांचे विस्तृत बौद्ध धर्म ग्रंथ यांचा अभ्यास आणि विस्तृत वाचन त्यांच्या उपयोगात आले. भारतीय संवधानावर विविध पाश्चात्य संविधानाचा प्रभाव असला तरी त्याचा आत्मा मात्र भारतीय आणि अगदी आदिवासी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य राष्ट्रवाद लोकशाही मूलभूत हक्क अल्पसंख्यांकाचे हितरक्षण समाजवाद साम्यवाद बौद्ध धर्म इत्यादी संबंधीचे विचार होते डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नांसंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञान या संबंधीची मते आपल्या अनेक लेखातून पुस्तकातून आणि भाषणातून मांडली आहेत तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत डॉक्टर आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेचे अधिवेशनात केलेल्या भाषणातून व्यक्त झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याचा राजकारणावर प्रभाव पडला आहे त्याचा आधुनिक भारतावर खोलवर परिणाम झाला .स्वातंत्र्योत्तर भारतात त्यांच्या सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे आणि सामाजिक आर्थिक आणि कायदेशीर प्रस्तावना द्वारे सामाजिक आर्थिक धोरणे शिक्षण आणि सकारात्मक कृतीकडे आज भारताचा दृष्टीकोन बदलला आहे त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्यावर उत्कट विश्वास होता. आंबेडकर यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या मोठ्या संख्येने राजकीय पक्ष प्रकाशने आणि कामगार संघटनांना जन्म दिला आहे. परंतु ह्यापैकी अनेक संघटना ह्या भरकटल्या आहेत त्या त्यांची उद्दिष्ट विसरून कार्य करत आहेत.
आंबेडकर म्हणत असत की"तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे."संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आम्ही भारताचे लोक अशी संविधानाची सुरुवात करून समता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश सर्वांसमोर ठेवला आहे .......1950 च्या दशकात आंबेडकरांनी बौद्ध धर्माकडे आपले लक्ष वळविले. पुण्याजवळ एक नवीन बौद्ध विहार समर्पित करताना त्यांनी घोषणा केली की ते बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहीत आहेत आणि ते पुस्तक पूर्ण होताच बौद्ध धर्मात औपचारिक पदार्पण करण्याची योजना आखत आहे. 1948 पासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता डिप्रेशन मुळे आणि दृष्टी कमी झाल्यामुळे ते जून ते ऑक्टोबर 1954 पर्यंत अंथरुणाला खिळून होते. राजकीय मुद्द्यांमुळे ते अधिकाधिक अस्वस्थ होत गेले. बुद्ध आणि त्याचा धर्म हे त्यांचे अंतिम हस्तलिखित पूर्ण केल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच सहा डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचे झोपेतच निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी 7 डिसेंबर रोजी समुद्र चौपाटी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले ज्यात हजारो समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
एड. सुनिता खंडाळे साळसिंगिकर, मुंबई.