Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जनाविरुद्ध 2 गुन्हे दाखल.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

         अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जनाविरुद्ध 2 गुन्हे दाखल. 
2 जेसीबी व 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.*




              लातूर-याबाबत माहिती अशी की, पोलीस ठाणे जळकोट हद्दीतील डोंगरगाव व बोरगाव येथील तिरू नदीपात्रात काही लोक बेकायदेशीर, बिगरपरवाना वाळू उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत आहेत. अशी माहिती मिळाली त्यावरून गुरुवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनवून धडक मोहीम राबवून बोरगाव येथील तिरू नदीपात्राच्या परिसरात छापा मारला तेव्हा तेथे आरोपी नामे
1) जीवन किशन केंद्रे, वय 45 वर्ष, राहणार बोरगाव, (खुर्द) तालुका जळकोट.
              हा तिरू नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने नदीपात्रातील गौण खनिज वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नदीपात्रात उतरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळू उत्खनन करून, शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी करून वाहतूक करीत असताना चोरलेली वाळू व वाहनासह 5 लाख 5 हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याचेवर पोलीस ठाणे जळकोट येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 213/2022, कलम 379, 34 भारतीय दंड विधान संहिता सह 48 (7 )(8 ) गौण खनिज कायदा 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
                 तसेच त्याच रात्री 3 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांच्या नेतृत्वातील पथकाने टाकलेल्या छाप्यात जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव शिवारात असलेल्या तिरू नदीपात्रातील वाळूचा बेकायदेशीर उपसा करीत असताना मिळून आलेले आरोपी नामे 

2)संदीप माधव चव्हाण, राहणार सुल्लाळी तांडा, तालुका जळकोट.

3) तुकाराम देविदास लुंगारे, राहणार मर्शिवनी ,तालुका कंधार.

4) दीपक रोहिदास करडे, राहणार डोंगरगाव.

5) सेवालाल बाबुराव जाधव, राहणार चिमेगाव तालुका औराद जिल्हा बिदर.

6)दीपक दामोदर परगे , राहणार घोंशी तालुका जळकोट.

7) दामोदर निवृत्ती परगे, राहणार घोणशी, तालुका जळकोट.

8)जयप्रकाश माधव मोरे, राहणार जाम, तालुका मुखेड.

9)माधव देश चव्हाण, राहणार सुल्लाळीतांडा, तालुका जळकोट.

           असे मिळून वाळूचे अवैध उत्खनन करीत असताना 2 जेसीबी, 1 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील चोरलेली वाळू अशा एकूण 29 लाख 500 रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे जळकोट येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 212/2022 कलम 379, 34 भारतीय दंड विधान संहिता सह 48 (7 )(8 ) गौण खनिज कायदा 2013 प्रमाणे गुरा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
           उपरोक्त आरोपींनी तिरू नदीपात्रातील डोंगरगाव व बोरगाव येथे 2 जेसीबी साह्याने 2 ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गौण खनिज वाळूचा उत्खननाचा कोणताही परवाना नसताना वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक , नदीपात्रात उतरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उत्खनन करीत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 34 लाख 5 हजार रुपयांचा अवैध वाळूसाठा व वाहने जप्त केली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे जळकोट करीत आहेत.
            सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम, पथकामधील पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ जाधव, रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर राख, पोलीस अमलदार गंगाधर शिंगडे, सिराज शेख, बाळासाहेब गडदे, सूर्यकांत कलमे, संतोष साठे, शिवाजी तोफरफे तसेच दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी केली आहे.
Previous Post Next Post