Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये महिलांच्या कमी तक्रारी... पुरुषांच्याही तक्रारी आल्या तर घेणार....फोटो क्राईम न्यूज चा 'स्त्री'Digital दिवाळी अंक २०२२चे केले कौतुक.. महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर

लातूर मध्ये महिलांच्या कमी तक्रारी... पुरुषांच्याही तक्रारी आल्या तर घेणार.... महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर











लातूर :लातूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याच्या मानाने महिलांच्या कमी तक्रारी असुन महिलांच्या प्रती लातूर जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.तसेच महिला आयोग हे नुसते महिलांसाठी काम करत नसुन जर पुरुषांच्याही तक्रारी आल्या तर त्या घेतल्या जात असून अन्याय झालेली प्रत्येक महिला व पुरुष राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात येऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन महिला आयोगाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी हि माहिती महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवार दि 1डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातर येथेआयोजीत पत्रकार परिषदेत दिली.








"फोटो क्राईम न्यूज चा 'स्त्री'Digital दिवाळी अंक २०२२ हा महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देण्यात आला त्यावेळी त्यांनी महिलाविषयक दिवाळी अंक असल्याने त्यांनी फोटो क्राईम न्यूज चे मुख्य संपादक विष्णु आष्टीकर यांचे विशेष कोतूक केले असून या बाबत पत्र हि पाठवणार असल्याचे सांगितले."
जिल्ह्यात महिलांसाठीचे कायदे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातून महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या सर्वात कमी तक्रारी येतात. त्यामुळे लातूरमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत उत्तम काम होत आहे. तसेच महिलांमधील कर्करोग निदानासाठी आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर राबविलेली विशेष मोहीम कौतुकास्पद असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा, यासाठी राज्य महिला आयोगाने ‘आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये आयोजित आढावा बैठकीत श्रीमती चाकणकर बोलत होत्या.

 

महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचे लवकर निदान होण्यासाठी लातूर जिल्ह्य परिषदेने ‘संजीवनी अभियान’ राबवून 30 वर्षांवरील तीन लाख 42 हजार महिलांची तपासणी केली असून त्यापैकी तीन हजार 900 महिलांची बायोप्सी चाचणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी सर्व शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये लैंगिक छळ तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. खासगी कार्यालयांमध्ये या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता कामगार विभागाने घ्यावी, अशा सूचना श्रीमती चाकणकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस आणि खासगी कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व चांगली प्रसाधनगृहे उभारावीत. दामिनी पथकाने गस्तीचे प्रमाण वाढवावे, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जावून महिला विषयक कायदे, तसेच तक्रार कोठे करावी, याबाबत मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

‘सोशल मिडिया वॉचर’ उपक्रम राज्यभर राबविण्याच्या सूचना करणार

पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सोशल मिडिया वॉचर’ उपक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. बदनामीकारक छायाचित्रे, लेखन यामुळे होणारी महिलांची बदनामी टाळण्यासाठी या उपक्रमांतर्गत पोलिसांकडून समाज माध्यमांवर लक्ष ठेवले जाते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध स्वतःहून कारवाई केली जाते. लातूर जिल्ह्यातील हा उपक्रम राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये राबविण्याची सूचना करणार असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेचा महिलांसाठी मोफत बससेवेचा उपक्रम स्तुत्य

लातूर महानगरपालिकेने महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत 22 लाख महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनी, महिला कामगार यांना दिलासा मिळाला असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी विविध विभागांमार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

 राज्यात महिलांनी साडी परिधान करावी, कोण म्हणतं सलवार चांगला दिसतो, कोण एखाद्या तरूणीस कपाळावर टिकली लाव असा उपदेश करतो. तेंव्हा खरच महाराष्ट्र ति महिलांसाठी ड्रेस कोड' ची गरज रूपालीताई चाकणकर यांनी महिलांचं कर्तृत्व टिकलीवरून ठरवू नका, त्यांचं कर्तृत्व पहा,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांनी कर्तृत्व सिद्ध केलं तेंव्हा त्यांच्या कपाळावर टिकली होती का? असा सवाल करून टिकली लाव म्हणणान्या वृत्तीचा त्यांनी निषेध केला.

जिल्हा प्रशासनाचे कौतुक

अनाधिकृत गर्भपात, महिलांतील कॅन्सरचे वाढते प्रमाण याबाबत चाकणकर यांनी चिंता व्यक्त करून महिलांनी कॅन्सरवरील निदान व उपचारासाठी संजीवनी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले. चाकणकर यांनी महिलांच्या प्रती लातूर जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने काम | करीत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.


क्लासेस, शाळांमधून स्वच्छतागृहे असलीच पाहिजेत
लातूर शहरात मोठ्या प्रमाणात खासगी शिकवणीचे वर्ग चालतात. तिथे विद्यार्थी, विद्यार्थीनींची राज्यातील महिलांवर संख्या मोठी आहे. अनेक शाळांमधून मुलींच्या स्वच्छता गृहाची कमी आहे. त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून मोहीम हाती घेतली गेली पाहिजे
 यासाठी जिल्हाधिकारी देण्याविषयी सूचना रूपाली चाकणकर यांनी दिल्या


तर लोकप्रतिनिधींवर कारवाई

बालविवाह कोरोनानंतर वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालविवाह प्रसंगी उपस्थित राहून डोक्यावर अक्षता टाकणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. बालविवाह होणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालसंगोपन योजनेतून अनुदान दिले जात नाही. कोरोनात निधन पावलेल्या व्यक्तीस ५० हजार रुपयांची मदत दिली जात नाही. या संदर्भात महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी देवदत्त गिरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.













Previous Post Next Post