गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पोलिस अधिक्षक कार्यालयाला लागून असलेल्या मयुरा हॉटेलवर धाड; तिर्रट खेळणाऱ्या ७ जुगाऱ्यांना अटक
लातूर : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी पोलिस अधिक्षक कार्यालयाला लागून अंबाजोगाई रोडवरील मयुरा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर तिर्रट जुगार चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला असुन, सुरूअसलेल्या तिर्रट जुगारावर बुधवारी (दि. ३०) रात्री ९ वाजेच्या सुमारास धाड टाकून ७ जणांनाअटक करण्यातआली. घटनास्थळावरुन ७लाख ६९हजार ९१०रुपयांचा ऐव जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
"अतिशय संयमी आणि शांत असलेले पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी शहरातील अवैध धंद्यावर कार्यवाही चा बडगा उगारला आहे.बहुतेक शांत आणि संयमी संयमी असल्याने जुगार्यांना त्यांचा आंदाज आला नाही त्यामुळे कोणालाही समजणार नाही या उद्देशाने पोलिस अधिक्षक कार्यालयाला लागूनच आपले बस्तान मांडले.परंतू पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही सुरु केली असून.अवैध धंदे करणार्यांचे आता धाबे दणानले आहेत."
मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी (दि. ३०) रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे युवराज रामगिर गिरी यांना मयुरा हॉटेल येथील तिर्रट जुगार खेळला व खेळविला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अधारे पथकासह अंबाजोगाई रोडवरील मयुरा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर पोचले या तिथे तिर्रट जुगार खेळताना आठ जुगारी आढळून आले. यामध्ये, प्रमोद विलास कांबळे (वय ३९, रा. महसुल कालनी लातूर), बाळु किशन भिसे (रा. रेणुका नगर, लातूर), राजकुमार राचप्पा रुकारे (वय ५०, रा. सैनिक कॉलनी, लातूर), रंजित गोपीनाथ डोगरे (वय ४३, रा. शिवाजीचौक, लातूर), संजु घोडीराम जाधव (वय ५१, रा. खाडगाव रोड, लातूर), शिवशंकर दामोदर (वय ३१, खडगाव रोड, लातूर), शेख अजत अब्दुल (वय ३५, रा. आनंद नगर, लातूर) यांचा समावेश होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आणि घटनास्थळावर उभ्या केलेल्या अरोपींच्या बुलेट, दुचाकी असा जवळपास ७ लाख ६९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या संदर्भात पोहेकॉ युवराज गिरी यांनी दिलेल्या तक्रारिवरुन ७ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुरनं ४८६/२२ कलम ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करवाईत पोहेकॉ युवराज गिरी, बालाजी कोतवाड, काकासाहेब बोचरे, अमित लहाने, वालचंद नागरगोजे, विजय पाटील आदिंनी सहभाग घेतला. पुढिल तपास सहायक पोलीस निरिक्षक कुदळे हे करीत आहेत.'