Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जे.जे.पान स्टॉलवर धाड;१० हजारांचा गुटखा जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जे.जे.पान स्टॉलवर धाड;१० हजारांचा गुटखा जप्त

लातूर : शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीतील जे.जे.पान स्टॉलवर टाकलेल्या छाप्यात १० हजार ५६० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत फिरदोस शमशोद्दीन शेख (वय ३२, रा. साईबाबा नगर, लातूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीतील जे. जे. पान स्टॉल येथे राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध विभागास मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी मंगळवारी (दि. २९) रात्री ९ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता तेथे राज्यशासनाने बंदी घातलेली वेगवेगळ्या कंपनीची सुगंधीत तंबाखु, वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला आढळून आला. घटनास्थळावरुन १० हजार ५६४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत आरोपी फिरदोस शमशोद्दीन शेख याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुरनं ४८५/२२ कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादंवि सह कलम ५९ अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post