गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांमार्फत होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी
लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना निवेदन सादर
लातूर: मागील अनेक वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला असून यांच्यामार्फत होत असलेली जनतेची आर्थिक लूट त्वरित थांबवावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपागर यांना निवेदन देण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा असलेला मुक्त वावर यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आणि नाहक मानसिक त्रास होत आहे. अशा सर्व दलालांना कार्यालयात येण्यास त्वरित पायबंद घालावा. यासोबतच जनतेच्या सोयीसाठी कार्यालयामार्फत पूर्ण वेळ मदत कक्ष स्थापन करावा अशा मागणीचे लेखी निवेदन असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, आशुतोष बारकुल, लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे नूतन जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर तोष्णीवाल, सचिव विश्वास कुलकर्णी, सोमनाथ मेदगे, कार्याध्यक्ष सागर वाडकर, कोषाध्यक्ष शफीक चौधरी, उपाध्यक्ष जाकिर सय्यद, रवि कानगुले, मदन केंद्रे, बाळू साबदे, वाजीद शेख, संतोष शिंदे, रवि अबुज, इम्रान पटेल, दिलीप कांबळे, असलम तांबोळी, योगेश माने, योगेश शिंदे, काशीनाथ बळवंते, नरेश घंटे, एजाज मणियार, अतुल गिरी, गणेश झुंजारे, बापू कदम, राजू निकम यांची उपस्थिती होती.