गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शाई फेक प्रकरणात साथीदारांना जामीन मंजूर !पोलिसांचेही निलंबन रद्द
पुणे सह-संपादक-दादाराव कांबळे
पुणे:संपुर्ण महाराष्ट्रात शाई फेक प्रकरणात भिमसैनिकांनी आवाज उठवल्या नंतर चंद्रकांत पाटलांनी जाहिर माफी मागीतली .परंतू पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. पिंपरी चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील उपस्थित होते.त्या आधी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
त्यामध्ये तिघाना पोलिसकाडून अटक करण्यत आली होती या प्रकरणात पिंपरी न्यायालयाने बुधवार दि.१४डिसेंबर रोजी भीमसैनिक मनोज गरबड़े विजय ओव्हाळ, धंनजय इजगज या तिघाचा जामिन मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.संपुर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात याचे पडसाद उमटले होते.या मध्ये एका पत्रकारालाही पोलिसांनी शुटींग का केले म्हणुन पकड़ले होते परंतू काही पत्रकार संघटनेनी यावर आवाज उठवल्यानंतर सोडण्यात आले.या शाईफेकीनंतर 11 पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे होते .त्यांचे देखील निलंबन रद्द करण्यात आले आहे.