गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पत्नीच्या तक्रारीवरून लातूरच्या उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप
लातूर-लातूरचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या विरूध्द पत्नीने हुंडा व इतर किरकोळ कारणावरून मानसिक, शारीरिक छळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवाजीनगर, पोलिस ठाण्यात महाडिक यांच्या विरूद्ध बुधवार दि१४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी मिताली महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, २०१८ मध्ये माझा विवाह झाला . दरम्यान हुंडा व किरकोळ कारणांसाठी मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला. २ एप्रिल २०२१ मध्ये पतीने मला व मुलास माहेरी सोडले. त्यामुळे मी पुणे येथील हिंजवडी येथे नोकरी करून माझ्या मुलासोबत राहत होते. दरम्यान, आहेत.
हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने कलम ४९८ अ, ५०६ ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी पती गणेश महाडिक यांनी माझ्याशी चर्चा केली, मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लातूर येथे वास्तव्यास आले. मात्र त्यानंतरही शारिरीक, मानसिक त्रास दिला. मारहाणीनंतर मला रुग्णालयात दाखल करावे लागले असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गणेश महाडिक, सासू लता महाडिक यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ४९८ अ ३०७, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे हे करीत