Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथे तिरुपती रेल्वेचे उत्साहात स्वगत -----खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांनी सुरुवात झाली रेल्वे

लातूर येथे तिरुपती रेल्वेचे उत्साहात स्वगत -----खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांनी सुरुवात झाली रेल्वे 
  
     https://youtu.be/3XPfTol4yWY
                                                                          
( लातूर-प्रतिनिधी )
                         
       --- तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी लातूर मार्गे नवीन साप्ताहिक रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे , लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून लातूरकरांची मागणी होती . या मागणीला लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करीत पाठपुरावा केला होता , आता या पाठपुराव्याला यश आले असून गुरुवार पासून हि रेल्वे सुरुवात करण्यात आली आहे . लातूर लोकसभा मतदार संघातील प्रवाश्यांची सोय व्हावी या दृष्टीने हि रेल्वेगाडी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर ,लातूररोड,उदगीर मार्गे सुरुवात करण्याची मागणी केली होती .
----आज पहाटे लातूर रेल्वे स्थानकावर तिरुपती रेल्वेचे नागरिकांनी फटाके वाजवत ,फुलांनी रेल्वे इंजिनची सजावट करीत स्वागत केले . यावेळी रेल्वेचे पायलट आणि को-पायलटचेही पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले . भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत हि गाडी तिरुपतीकडे मार्गस्थ करण्यात आली. यावेळी भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना, बाबा गायकवाड , विजय अवचारे ,अनिल कबाडे, संजय सोनकांबळे, शैलेश भडीकर, अतिश कांबळे,सिद्धांत शृंगारे, अभिजित पालमवाड,बद्रीनाथ मंत्री, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
          --- याबाबत मध्यरेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिलेली माहिती अशी कि , १५ डिसेंबर२०२२ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सोलापूर-लातूर-उदगीर-बिदर-कलबुर्गी मार्गे तिरुपती हि साप्ताहिक विशेष रेल्वगाडी गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे . लातूरवरून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची लातूरकरांची मागणी होती , या मागणीला लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करीत पाठपुरावा केला होता . याशिवाय रेल्वे विभागाच्या बैठकांमध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांनी वेळोवेळी तिरुपती गाडीची मागणी केली होती .
------ लातूर जिल्ह्यासह लोहा,कंधार, मुखेड या भागातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी आहे , हि गाडी सुरुवात करण्यात आल्याने भाविकांना सोयीचे होणार आहे , जास्तीत जास्त भाविकांनी या गाडीने प्रवास करावा म्हणजे प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेल्या या गाडीच्या फेऱ्या वाढवता येतील . त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिल्यास हि रेल्वे गाडी नियमित करण्यास पाठपुरावा करता येईल, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे .
----सोलापूर-लातूर-बिदर-कलबुर्गी-तिरुपती या रेल्वेगाडीचा क्रमांक-०१४३७ असून हि रेल्वेगाडी सोलापूर येथून दर गुरुवारी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि लातूर स्टेशनवर हि गाडी शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी येऊन २. ३५ ला उदगीरकडे मार्गस्थं होईल . सोलापूर ,कुर्डुवाडी ,बार्शी ,उस्मानाबाद ,लातूर ,लातूररोड ,उदगीर ,भालकी ,बिदर ,हुमनाबाद ,कलबुर्गी ,वाडी मार्गे तिरुपतीला शुक्रवारीच रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल . परतीच्या प्रवासात त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी तिरुपतीहून लातूर मार्गे ,सोलापूरकडे निघेल . परतीच्या प्रवासात या गाडीचा क्रमांक -०१४३८ असेल . 
Previous Post Next Post