Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोटच्या ०३ मुलांनी खोटी कागदपत्रे तयार करुन ८० वर्षीय पित्याची केली फसवणूक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 पोटच्या ०३ मुलांनी खोटी कागदपत्रे तयार करुन ८० वर्षीय पित्याची केली फसवणूक
वडिलांची थेट राष्ट्रपतींकडे न्यायाची मागणी




लातूर : पोटच्या तीन मुलांनी बनावट दस्तावेज तसेच बनावट सह्या करून आपल्या ८० वर्षीय पित्याला गंडविलं आहे. याशिवाय जन्मदात्या पित्याला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. याप्रकरणी तक्रार करूनही लातूर पोलीस दखल घेत नाहीत. त्यामुळे ८० वर्षीय पीडित सलीमबिन मो. चाऊस यांनी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपालांकडे न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

   लातूर शहराजवळील नांदगाव येथील सलीमबीन मोहम्मद चाऊस हे ८० वर्षीय गृहस्थ गेल्या अनेक वर्षांपासून लातूरमध्ये राहतात. त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत. तिन्ही मुलींचे लग्न झालेलं असून त्या त्यांच्या संसारात सुखी आहेत. मात्र तिन्ही मुले नामे हमीदबीन चाऊस, जावेदबीन चाऊस व असलमबीन चाऊस रा. गांधी नगर, लातूर व रा नांदगाव ता जी लातूर यांनी आपल्याच वृद्ध पित्याला फसवून त्यांच्या नावे असलेली सर्व मालमता आपल्या नावे करून घेतली आहे.मौ. कन्हेरी येथील जमीन सर्वे नंबर ३८ व ३९ मधील घरजागा तसेच वडिलांना घराबाहेरचा रस्ता दाखवत हाकलून दिलं आहे. नांदगाव गट नं. २५३ मधील ० हे. ५१ आर. जमीन तसेच लातूर मनपा हद्दीतील सर्वे नंबर 3८ व ३९ मधील मालमत्ता क्रमांक आर-७/७७ मधील राहत्या घरातच बनावट दस्तावेज, खोट्या सह्या करून हडप केले. त्यानंतर या पोटच्या तीनही मुलांनी वर्ष २०१५ मध्ये घरातून हाकलून दिलं आहे. 

शुगर, बी.पी. सारख्या वृद्धकाळातील व्याधींनी ग्रस्त असतानाही आपल्या मुलांनी केलेल्या प्रकाराबाबत समाजातील दारुलइसला यांच्या समितीकडे तक्रार केली. मात्र मुलांनी त्यांचे काहीही ऐकलं नाही. त्यामुळे मुलांकडून पोटगी मिळावी म्हणून मा. उपविभागीय अधिकारी यांच्या फॅमिली कोर्टात अर्ज केला. ज्यात मा.पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ०३ हजार रू.प्रमाणे एकूण ०९ हजार रुपये दरमहा पोटगी तीनही मुलांना देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात तीनही मुलांनी मा. जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे अपील केले. ज्यात मा. जिल्हाधिकारी यांनी पोटगीची ०९ हजारांची रक्कम कमी करून ०६ हजार रू. दरमहा पोटगी देण्याचे आदेश दिले. परंतु २०१९ पासून एक रुपया पोटगीही पोटच्या मुलांनी दिलेली नाही. २०१५ पासून आतापर्यंत लातूर येथील त्यांच्या मीत्राच्या मुलीकडून हात उसने पैसे घेऊन ८० वर्षीय सलीमबीन मो. चाऊस हे आपली उपजीविका भागवीत आहेत. या दरम्यान खाजगी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने नांदगाव येथील • हे ६८ आर जमीनीपैकी ० हे ३० आर जमीन विक्री करण्याचे ठरविल्यानंतर आपल्या मुलांनी बनावट कागदपत्रे आणि बनावट सह्या करून फसवल्याचे तलाठी नांदगाव यांच्या कार्यालयामार्फत पुढे आलं. 

  याबाबत लातूर एमआयडीसी पोलीस ठाणे इथे आपल्या मुलांनी आणि इतर साथीदारांनी मिळून बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या करून आपली फसवणूक केल्याची तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केलं आहे. या दरम्यान १४ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदगाव येथील नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमात माझ्या मुलांनी सर्व नातेवाईकांपुढे लाकडाने, लाथा-बुक्क्यांनी मारहाणही केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी मुलांविरोधात कलम ३२४,३२३ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. 

आता वृद्धपकाळात आपण कमवलेल्या घरात मुले व आपण भाड्याच्या घरात, आपल्याला स्वतः कमाई केलेले घर आणि जमीन आपल्या ताब्यात मिळावी यासाठी सलीमबीन मो. चाऊस यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभा सभापती, विरोधी पक्ष नेते-मुंबई, पोलीस महासंचालक-मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक-नांदेड परिक्षेत्र, मानवी हक्क आयोग, जिल्हाधिकारी-लातूर, जिल्हा पोलीस अधीक्षक-लातूर यांना एक निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीकडे आता कसा न्याय मिळतो याकडे ८० वर्षीय सलीमबीन मोहम्मद चाऊस हे आस लावून बसले आहेत.
Previous Post Next Post