गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अधिकाऱ्यांनीच मागीतली खंडणी... दिली नसल्यानेच खोटा गुन्हा नोंद ..तो गर्भपात वैधच...!
आता फिर्यादीच आरोपी होणार...!!
डाॅ.ओ.एल.किनगांवकर यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
अहमदपूर/प्रतिनिधि
आरोग्य विभागातील जिल्हा शैल्यचिकीत्सक यांनी मागणी केलेली 4लाख रूपयाची खंडणी दिली नसल्याने माझ्या विरोधात कट कारस्थान करून,कायद्याच्या पातळीवर न टिकणारा खोटा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी आता कोर्टाने सूध्दा मला दिलासा दिला असून या प्रकरणात फिर्याद देणारे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व त्यांची टीम हेच कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी असून या प्रकरणात तातडीने कारवाई करण्या बाबत संबंधीत यंत्रणेकडे दाद मागणार असल्याचे येथील स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डाॅ.ओ.एल.किनगांवकर यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत सांगीतले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,सदरहू घटनेचा इतिहास सौ. मंगला (नाव बदलले आहे) ही दुसऱ्यांदा गरोदर असलेली महिला, डॉ.सौ. उगीले मॅडमची नियमीत पेशंट होती. त्यांनी ती तीची डॉ. पलमटे कडे सोनोग्राफी करून तिचा उपचार सुरु होता दि. 22/09/2021 रोजी म्हणजे सोनोग्राफीचे कवेळी ती 26 आठवड्याची गर्भवती होती. दि. 26/09/2021 रोजी अचानाक चक्कर आल्यामुळे तीची प्रकृती बिघडली म्हणून ती सौ. सविता बेरळकर यांचे दवाखान्यात गली, त्या वेळी तीचा रक्तदाब 180/120 होता. म्हणजे अतिउच्च होता, ती गंभीर असल्यामुळे त्यांनी तीला डॉ. दत्तात्रय
बिराजदार वैद्यकिय अधीक्षक यांचे खाजगी दवाखान्यात पाठवले. दि. 26-27/09/2021 परंतू ती त्यांचेच दवाखान्यात ICU मध्ये उपचार घेत होती. तीचा अतिउच्च रक्तदाब नियंत्रणात येत नसल्यामुळे, डॉ. बिराजदार यांनी तीला पुन्हा डॉ. सौ. उगीले यांचेकडे पाठवले, दि. 28/09/2021 रोजी, त्या महिलेची प्रकृती आनखीच खालावली म्हणून तिला लातूरला फुलाबाई बनसुडे येथे पाठवले. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे नातेवाईकांनी तिला जवळच असलेल्या विठाई हॉस्पिटल येथे डॉ. अनुजा बेरळकर यांचे दवाखान्यात ICU मध्ये अॅडमिट केले. त्यावेळी त्या महिलेचा रक्तदाब 200/130 ऐवढा होता. दुसरे दिवशी म्हणजे दि. 29/09/2021 रोजी सकाळी 7-8 वाजता तिला पुन्हा लातूरला जाण्याचा सल्ला दिला. ही महिला आणि नातेवाईक आष्टामोडच्या पुढे गेल्यावर समजले की, भातखेड्याच्या पुलावरून मांजरा नदी वाहत आहे. दोन्ही बाजुंनी 2- 2 कि.मी. वाहतूक बंद आहे. म्हणून नातेवाईकांनी या महीलेस वापस अहमदपूर येथे माझ्या दवाखान्यात 10.00 वाजता आणण्यात आले. मी तीची तपासणी केली असता तिचा रक्तदाब अतिउच्च म्हणजे 190/120 ऐवढा होता. ऐवढा मोठा रक्तदाब होण्याचे मूख्य कारण म्हणजे तिचे गरोदरपण आहे. ती फक्त जिवंत होती पण शवणासनं अवस्थेत होती. तिचा जीव वाचवायचा असेल तर गर्भ बाहेर काढणे अत्यंत आवश्यक होते. तिच्या पतीस ही संपूर्ण पूर्व सुचना देऊन चांगल्या उद्देशाने आणि गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी ती जरी 27 आठवड्याची गरोदर होती तरी मी तीचा गर्भपात केला आणि तशी नोंद सर्व कागदपत्रावर आणि MTP नोंदणी रजिस्टरवर घेण्यात आली. सदरहू गर्भपात हा' वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 कलम 5 च्या अधिन राहून केला आहे. म्हणून यास अवैध / बेकायदेशीर संबोधने चुकीचे आहे. म्हणजेच हा केलेला गर्भपात कायदेशीर आणि वैध आहे. परंतू डॉ. बिराजदार आणि डॉ. सुरजमल यांचे बौद्धिक दिवाळखोरीमुळे ते याला बेकायदेशीर गर्भपात असे संबोधतात.
FIR मधील पॅरा दोन मध्ये तो म्हणतात की, तो ऑक्टोबर 2020 पासून वैद्यकिय अधीक्षक पदावर आहेत आणि “तालुका समुचित प्राधीकारी” म्हणून एम.टी.पी. सेंटरची (गर्भपात केंद्राची) तपासणी करण्याचे त्यांना अधिकार प्राप्त आहेत. हे अत्यंत चुकीचे दिशाभुल करणारे लिखान आहे. वैद्यकिय गर्भपात कायदा 1971, रुल्स 2003 च्या रुल 2 (ब) प्रमाणे जिल्ह्याचे मुख्य वैद्यकिय अधिकारी म्हणजे सिव्हील सर्जन यांना सक्षम प्राधिकारी म्हणून शक्ती प्रदान केली आहे. या कायद्याला फाटा देऊन असे कोणालाही अधिकार प्रदान करण्याचे अधिकार सिव्हील सर्जनला नाहीत. म्हणजेच डॉ. बिराजदार यांचा, अधिकार प्राप्त असण्याचा दावा निव्वळ खोटारडा आणि दिशाभुल करणारा आहे.
म्हणून याच बौद्धीक दिवाळखोरीच्या आट्टाहासाने, ते सक्षम अधिकारी नसताना, डॉ.सुरजमल यांना सोबत घेऊन दि.15/02/2022 रोजी माझ्या गर्भपात केंद्राची तपासणी केली. असे त्यांनी FIR च्या पॅरा 3 मध्ये निवेदन केले आहे. त्यांचे या वक्तव्यामुळे, वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 रेग्युलेशन 6 चा त्यांनी जाणून बुजून भंग केला आहे, तसेच त्यांनी 2014 पासून ते 2022 पर्यंतची रजिस्टर मधील गर्भपात झालेल्या महिलांची नावांची आणि च्या त्यांचे इतर गुप्तांचे उल्लंघन करून, कलम 5-अ (2) चा भंग केला आहे. ते जर त्रैमासीक दिली. का सदर कालावधी प्रमाणे गर्भपात केंद्राची तपासणी करतात तर 2014 पासून ते आजतागायत पर्यंत का झोपा काढत होते का? मागील 8-10 वर्षात जर 50-60 गर्भपात 20 आठवड्याच्या वरचे होते तर तेंव्हाच का माझ्या विरुद्ध FIR नोंदला नाही? हा प्रश्न तर उरतोच. दि. 15/02/2022 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक तपासणीचा अहवाल डॉ. बिराजदार यांनी केली. दि. 16/02/2022 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक लातूर यांना पाठवला. त्या कार्यालयाती सर्वांनी वाचला तसेच त्या कार्यालयातील डॉ. श्रीधर पाठक आणि अँड.सौ.ए.पी. मेखले (भोसले) लॉ ऑफिसर यांनी देखील वाचला. हे दोघे डॉ. लक्ष्मण देशमुख (सिव्हील सर्जन) यांचे हप्ता वसुली एजंट आहेत. डॉ. देशमुख यांचेश सांगण्यावरून हे दोघे दि. 03/03/2022 रोजी माझ्या दवाखान्यात तपासणी करण्याच्या निमित्ताने दुपारी 2 वाजता आले त्या पेशंटची फाईल द्या, ते पॉकेट द्या. ते MTP नोंदणी रजिस्टर द्या म्हणून त्यांनी बेकायदेशीरपणे उपरोक्त साहित्य जप्त केले, आणि त्याची पावती मला दिली, जाताना म्हणले की, साहेबांनी 4 लाख रुपये सांगितले आहेत उद्या लातूरला घेऊनदया. ही दि. 03/03/2022 ची खंडणी मागण्याची घटना हेतूपुरस्पर FIR मध्ये वगळण्यात आली आहे. मी 4 लाख रुपये न दिल्यामुळे दि.07/03/2022 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एक बेकायदेशीर जिल्हास्तरीय समिती गठीत करून दि.08/03/2022 रोजी हे पथक तपासणीसाठी पाठवले. हे पथक बेकायेदशीर आहे हे यासाठी कारव म्हणतो की, वैद्यकिय गर्भपात कायदा 1971, रुल्स 2003, रुल 3 प्रमाणे जिल्हास्तरीय कमिटीची रचना अशी आहे. अध्यक्ष 1. सिव्हील सर्जन, सदस्य :- 2 स्त्रिरोगतज्ञ / सर्जन / भुलतज्ञ, 3. स्थानीकचे (लातूर शहरातील) एक डॉक्टर, 4. NGO 5. Z.P.Member आणि या कमिटीचे काम फक्त, खाजगी दवाखान्यास MTP करण्याची परवानगी देणे, यांचे काम खाजगी दवाखाने तपासणे हे अजिबात नाही. म्हणून दि. 08/03/2022 रोजी तपासणीसाठी आलेली समिती ही बेकायदेशीर होती; म्हणजेच या समितीने दिलेला अहवाल हा बेकायदेशीरच आहे. असणार, या बेकायदेशीर अहवालावर चर्चा करण्यासाठी दुसरी एक अशीच बेकायदेशीर जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक दि.23/03/2022 रोजी आयोजीत केली होती. त्यामध्ये मला खुलासा सादर करण्यास सांगितले, त्याप्रमाणे मी खुलासा सादर केला. सर्व कायदेशीर तरतुदीचा उल्लेख करून देखील त्यांनी माझा खुलासा मान्य केला नाही. हा चौकशीचा नुसता फोर्स होता दि. 03/03/2022 च्या 4 लाखाच्या खंडणीची पूर्तता न केल्यामुळे त्यांनी कसेतरी करून या गर्भपाताच्या केसमध्ये आडकवायचेच. या जातीयवादी द्वेष भावनेने आणि संगनमताने आणि संघटीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे माझ्यावर ही खोटी आणि सुडबुद्धीने केलेली ही कार्यवाही आहे.
जिल्हाशल्य चिकित्सक यांचे कार्यालयात कायदेतज्ञ अँड. मेखले हे कार्यरत असताना, त्यांनी अँड.मंगेश महेंद्रकर, साहायक सरकारी वकील जिल्हा न्यायालय लातूर यांना काहीतरी पैसे (मानधन) देऊन त्यांचा बेकायेदशीरपणे सल्ला घेऊन माझ्यावर खोटा FIR दाखल केला आहे. बेकायदेशीररित्या सल्ला म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी, जिल्हा सरकारी वकील यांचे कार्यालयास पूर्ण संचिका देऊन त्यांचा कायदेशीर सल्ला घेणे अपेक्षीत होते. तसे न केल्याचे जिल्हा सरकारी वकील, जिल्हान्यायालय लातूर यांनी त्यांचे पत्र दि.07/11/2022 रोजी मला RTI अंतर्गत कळविले आहे. ही सर्व खोटी-खोटी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून, दि.11/10/2022 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पुढील कार्यवाही म्हणजे FIR दाखल करण्याच्या सुचना दिल्याचे FIR मध्ये नमुद केले आहे. तरीसुद्धा दिड महिना ते सतत खंडणीची मागणी करतच राहीले. परंतु मी त्यांना खंडणी न दिल्यामुळे चिडून जाऊन, जातीयवादी द्वेष भावनेने शेवटी 25/11/2022 रोजी रात्री 22:17 वाजता खोटी फिर्याद पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दाखल केली. या घटनेचा आणि कार्यवाहीचा मुख्य सुत्रधार, मा. डॉ. लक्ष्मण देशमुख हे आहेत.
अटकेच्या आणि मानहाणीच्या भितीपोटी मी जामीनासाठी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदपूर येथे दि.28/11/2022 रोजी अर्ज केला होता. त्या अर्जावर मा. न्यायालयाने सविस्तरपणे कायदेशीर अभ्यास करून, आणि दोन्ही बाजूचा सविस्तर युक्तीवाद ऐकून घेऊन दि.07/12/2022 रोजी असा निकाल दिला की, “अर्जदाराने कोणताही गुन्हा केला नाही, FIR मध्ये नमुद केलेल्या कायद्यातील गुन्ह्यामध्ये काहीच शिक्षा नाही. तरी काय म्हणून जामीन मंजूर करू? गुन्हा नाही, नोंद केलेल्या कलमा अंतर्गत शिक्षा नाही. म्हणून हा अर्जच चुकीचा आहे. म्हणून हा जामीनाचा अर्ज मा. न्यायालयाने निकाली काढला आहे.” माझ्या तर्फे अँड. सतिष कांबळे आणि फिर्यादी तर्फे अँड महेश पाटील यांची युक्तीवाद केला.
उपरोक्त मा. न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असाच होतो की, दि. 25/11/2022 रोजी दाखल केलेला FIR हा खोटा, सुडबुद्धीने आणि जातीयवादी द्वेष भावनेने दाखल केला आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास न करता माझी बदनामी व्हावी या हेतूने जातीयभावनेतून
सूडभावनेने माझ्यावर दाखल केला खोट्या गुन्हयाच्या बाबतीत योग्य त्या यंत्रणेकडे दाद मागणार असून आरोग्य विभागातील वसुलीचे 'सचिन वाझे' जनतेसमोर आणानार आहे.
(डॉ.ओ.एल. किनगावकर,
स्त्री रोग तथा प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ,माजी वैद्यकीय अधीक्षक,
किनगांवकर हाॅस्पीटल, अहमदपूर जि.लातूर)
9404274639