लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायद्याच्या तात्काळ मागणीसाठी समस्त लातूरकरांचा हिंदू जनआक्रोश मोर्चा
जिहाद ची बळी ठरलेल्या श्रद्धाला वाहीली 'श्रद्धांजलि'
👆'Photocrimenews' 👆is also Plz see on YouTube
लातूर ( प्रतिनिधी)
आधी मोर्चा मग व्यापार ... असे घोष वाक्य वापरून लातूर शहरातील व्यापाऱ्यांना आव्हान करण्यात आले ...लातूर शहर असो किंवा जिल्हा यात लव जिहाद चे प्रकार वाढत आहेत .. हे थांबवायचे असतील तर जन जागृती आवश्यक असून .. याची सुरुवात स्वतःपासून ...स्वताच्या दुकान पासून ...स्वताच्या घरा पासून करावी ...असा उद्देश समोर ठेवून मोर्चायचे आयोजन करण्यात आले ...
गंज गोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले .. बुधवार दि 21 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ह्या मोर्चाला सुरुवात झाली ..गंज गोलाई हनुमान चौक...गांधी चौक ...टाऊन हॉल ..अशोक हॉटेल मार्गणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता होणार आहे ...या मोर्चात मोठ्या संख्येने व्यापारी.. शैक्षणिक संस्था .. विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता ..व्यापार्यांनी मोर्चा मार्गातील दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सहभाग घेतला होता .. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
-लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायद्याच्या तात्काळ मागणीसाठी समस्त लातूरकरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात लातूरकर प्रचंड प्रतिसाद देत उतरले. आई जगदंबा मंदिर गंजगोलाई येथून सुरू झालेला हा मोर्चा जगदंबा मंदिरामध्ये मातेचे स्मरण करून सुरू करण्यात आला. गंज गोलाईला प्रदक्षिणा मारून हा मोर्चा हनुमान चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपला.
यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व लोकांनी सदैव धर्म रक्षण व धर्मनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा घेतली. सोबतच सर्वधर्मसमभाव म्हणत असताना धर्मावर संकट जर येत असेल तर त्याचा प्रतिकार देखील आम्ही तितक्याच ताकदीने करू. तसेच लव्ह जिहाद सारख्या विषयांमध्ये बळी पडलेली आमची माता, भगिनी कधीही घरी येण्याची इच्छा तिला झाल्यास तिला वापस घेऊन आम्ही तिचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी प्रतिज्ञा यावेळी घेतली
या मोर्चादरम्यान सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवून मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गांधी चौक, अशोक हॉटेल या भागामध्ये माझं लातूर परिवार आणि ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने मोर्चातील लोकांसाठी पाण्याचे वाटप करण्यात आले. मोर्चाची सांगता प्रत्यक्ष श्रद्धा अभिनयातून बोलते आणि तिचे व्यथा मांडते आहे अशा माध्यमातून करण्यात आली. तसेच श्रद्धाच्या वडिलांच्या मनातील व्यक्त झालेल्या भावना लोकांसमोर प्रस्तुत करण्यात आल्या.
मोर्चाच्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या त्या म्हणजे लव्ह जिहाद विरुद्ध कायदा झालाच पाहिजे आणि धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे. तसेच अनेक घोषणा मोर्चाच्या दरम्यान देण्यात आल्या. या मोर्चाची प्रमुख मागणी लोकांनी मोर्चात सहभागी होऊन प्रकर्षाने सरकारच्या व जनतेच्या समोर मांडली.
तसेच एकता मे जान है! हिंदू देश की शान है, श्रीरामाचे आम्ही हनुमान भारतीय स्त्री आमचा अभिमान, धर्मांतरण विरोधी कायदा झालाच पाहिजे, प्रणाम आमचा आईला माता मानतो गाईला, जपूया आपली नाजूक कळी नाही जाऊ देणार लव जिहाद ची बळी आणि श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचे फलक घेऊन लातूरकर मोर्चा सहभागी झाले होते.