अदानीला परवाना देण्यास वीज कामकारांचा विरोध
निर्णयाच्या विरोधात संघटनांची व्दारसभा,घोषणा देत केला निषेध
लातूर-अदानी इलेक्ट्रिसिटीने महावितरणच्या मुंबई उपनगरात समांतर वीज वितरण परवाना मिळावा यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज
केला आहे.जर वीज नियामक आयोगाने परवानगी दिली तर त्यांचा मोठा आर्थिक फटका महावितरणला बसणार आहे.पर्यायाने विज ग्राहकांला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील या पुर्वीचे अनुभव लक्षात घेता कोणत्याही खाजगी कंपन्या विज ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकली नाही करोडो रुपये बुडवून कंपण्या निघुन गेल्या आहेत.त्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विसकटणार आहे.आता जर अदानी कंपलीला परवानगी दिल्याच महावितरणला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल.या निर्णयाला महावितरण मधील ३० समविचारी संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी ,अभियंता संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध केला आहे याचाच एक भाग म्हणून लातूर महावितरण परिमंडळा समोर दुपारी विज कर्मचाऱ्यांनी भव्य अशी व्दारसभा घेत या निर्णयाचा विरोध करत निषेध व्यक्त केला.यावेळी कामगार प्रतिनिधी राजकुमार कत्ते,अनिल पुरी,राजीव भुजबळे,सिध्दार्थ कुसभागे,राहुल भंडारे,अजित जैन,गंगाधर भाडुळे,डि.के.गवळी,दिलीप भुसे,खिचडे मँडम आदिनी या व्दारसभेला संबोधीत केले.यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकार्याची तसेच विज कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.