विविध साहित्य खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आवाहन
लातूर, दि. 22 (जिमाका) : 34 वे रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला विविध माहिती पुस्तिका, पत्रे, बॅनर्स इत्यादी साहित्य खरेदी करावयाचे आहे. यासाठी 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रके बंद लिफाफ्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय, परिवहन भवन, बाभळगाव रोड, लातूर- 413 512 येथे सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.
बॅनर्स छपाईचे प्रति चौरस फुटाचे दर, ए-4 आकाराची माहितीपत्रके (हँडबिल) पाच हजार नग, सर्वसमावेशक 1/8 आकारातील माहितीपुस्तिका (रंगीत) तीन हजार नग, ए-4 आकारातील रंगीत वाहतूक चिन्हे व नियमांचे हँडबिल तीन हजार नग, स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहितीचे स्टिकर्स पाच हजार नग, ऑनलाईन सर्व्हिसेस माहितीचे ए-4 आकारातील लीफलेट पाच हजार नग, स्लोगन किंवा पिक्चर्स हँड पोस्टर रॅलीसाठी (12 x 18) प्रति चौरस फुटाचा दर, तसेच लाल, पिवळा, पांढऱ्या रंगाची मान्यताप्राप्त रिफ्लेक्टरचा दर सर्व करांसह सादर करावा.
दरपत्रके पोस्टाने पाठविल्यास ती 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त होतील, याची जबाबदारी दरपत्रके पाठविणाऱ्या व्यक्तीची राहील. मुदतीनंतर पोस्टाने प्राप्त झालेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. दरपत्रके मान्य किंवा रद्द करण्याचे सर्वाधिकार लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे राहतील, असे श्री. नेरपगार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.