गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर परिवहन कार्यालय बनणार एजंट विरहित..जनतेच्या कामासाठी मदत कक्षाची स्थापना
सह मोटरवाहन निरीक्षकांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती
■ नागरिकांच्या माहितीसाठी जागोजागी कार्यालय परिसरात व आवारात माहिती फलक लावण्यात आले आहेत.■ कार्यालयातील कामकाजाविषयी अडचण येऊ नये, त्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत.
लातूर :लातूर परिवहन कार्यालय मागील काही महिन्यांपासून तेथील एजांटांमुळे बदनाम होत चालले असून त्याचा फटका उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांना बसत आहे किंबहुना त्यांनी एजंटांना कार्यालयात फिरण्यासाठी सुट दिल्या कारणाने ते अधिकार्यांच्या वरचड झाले आहेत.विशेष म्हणजे हे एजंट अधिकार्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेकडून सर्रास पैसे उकळत आहेत.एजंटासोबत काही अधिकारी कर्मचार्यांची मिलीभगत असल्याकारणाने सर्वसामान्य जनतेची लुट मात्र थांबताना दिसत नाही. या एजंटांचा फटका काही ट्रॅव्हल्स मालकांना बसल्यामुळे लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांमार्फत होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले.या निवेदनात प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा असलेला मुक्त वावर यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आणि नाहक मानसिक त्रास होत आहे. अशा सर्व दलालांना कार्यालयात येण्यास त्वरित पायबंद घालावा. यासोबतच जनतेच्या सोयीसाठी कार्यालयामार्फत पूर्ण वेळ मदत कक्ष स्थापन करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली.यातील काही मुद्दे अधिकार्यांनी मान्य केले.परंतू या आधीच शासनाने परिवहन विभागातील एकूण ५८ सेवा आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस पद्धतीने देण्याबाबत निर्देश आहेत. यापैकी १६ सेवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत फेसलेस पद्धतीने देण्यात येत आहेत.परंतू आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा असलेला मुक्त वावरावर पायबंद बसण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या सोयी साठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला असून, सहमोटार वाहन निरीक्षकांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याचा जनतेने लाभ घेण्यासाठी अवाहन करण्यात आले आहे.
या मदत कक्षांमध्ये शिकावू परवाना,मोटर साईकिल परवाना,मोटर वाहन परवाना, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, नाहरकत प्रमाणपत्रावरील प्रमाणपत्र, पत्ता नोंदणी वाहनासंबंधी कर्जबोजा रद्द करणे, वाहन चालक दुय्यमीकरण, वाहन अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, अनुज्ञप्तीची माहिती मिळविणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ बदल, अनुज्ञप्तीमधील पत्ता बदलणे, शिकाऊ अनुज्ञप्तीमधील नाव बदलणे, शिकाऊ अनुज्ञप्तीमधील फोटो, हस्ताक्षर चालक बदलणे, शिकाऊ अनुज्ञप्तीचे दुय्यम प्रत काढणे.याबाबत ची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे.
माहिती फलक■ नागरिकांच्या माहितीसाठी जागोजागी कार्यालय परिसरात व आवारात माहिती फलक लावण्यात आले आहेत.• कार्यालयातील कामकाजाविषयी अडचण येऊ नये, त्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत.