पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षात करणार फॅक्टरीचे उदघाटन-
--खासदार सुधाकर शृंगारे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट --
लातूर-प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघातल्या रेल्वे संदर्भातील अनेक मागण्यांना घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली . या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत ,मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची निविदा प्रक्रिया सुरु असून ती जानेवारी अखेर पर्यंत संपेल आणि त्या नंतर नियुक्त करण्यात येणारी कंपनी हि सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करेल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या उदघाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात येणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे . मराठवाड्याचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या या कोच फॅक्टरीमध्ये स्थानिकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आश्वासित केले आहे . अशी माहिती लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे .
-- खासदार सुधाकर शृंगारे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली या भेटी दरम्यान रेल्वे संदर्भातील अनेक मागण्याबाबत चर्चा झाली आहे . औरंगाबाद-हैदराबाद रेल्वेला पानगाव येथे थांबा देण्यात यावा . पुणे-अमरावती रेल्वेला पानगाव येथे थांबा दयावा . बिदर-लातूर-मुंबई एक्स्प्रेसला मुरुड येथे थांबा देण्यात यावा ,या मागण्या करण्यात आल्या आहेत . तर लातूर रेल्वे स्टेशनच्या विस्तारासाठी पिटलाईन उभारणीच्या कामाला मंजुरी देण्यात यावी हि मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे . लातूर रेल्वे स्टेशनवर पिटलाईन झाल्या नंतर अनेक रेल्वेगाड्या लातूर मार्गे सुरुवात करणे शक्य होणार आहे . त्यामुळे पिटलाईन बद्दल खासदार सुधाकर शृंगारे यांनी आग्रह धरला आहे. मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा मिळाल्याने मुरुड भागातील जनतेला सोयीचे होणार आहे . तर पानगाव येथे थांबा मिळाल्याने नागरिकांना हैद्राबाद आणि औरंगाबाद,अकोला,अमरावतीकडे जाण्याची सोय होणार आहे .
---मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरीच्या संदर्भात बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सध्या टेंडरिंग प्रोसेस सुरु असून जानेवारी अखेर पर्यंत हि प्रोसेस संपेल आणि त्या नंतर नियुक्त करण्यात येणारी कंपनी हि सर्वेक्षणाचे काम सुरु करेल . नवीन वर्षांत या फॅक्टरी मधून प्रत्यक्ष बोगी निर्मितीला सुरुवात होईल . मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरी हा देशातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे ,त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदघाटनासाठी आम्ही आग्रहाने निमंत्रित करणार आहोत अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे . मराठवाडा कोच फॅक्टरी मध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे या खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलेल्या मागणीवर स्थानिकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येईल असे अश्विनी वैष्णव यांनी अश्वासन दिले आहे .