Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये ट्रॅव्हल्स मालक आणि आरटीओ एजंटामध्ये वाद पेटला...

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये ट्रॅव्हल्स मालक आणि आरटीओ एजंटामध्ये वाद पेटला...
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांच्या अडचणीत वाढ..

नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी ग्राहक संरक्षण समितीचे आरटीओंना साकडे







लातूर :लातूर परिवहन कार्यालय मागील काही महिन्यांपासून तेथील एजांटांमुळे बदनाम होत चालले असून त्याचा फटका उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांना बसत आहे किंबहुना त्यांनी एजंटांना कार्यालयात फिरण्यासाठी सुट दिल्या कारणाने ते अधिकार्यांच्या वरचड झाले आहेत.विशेष म्हणजे हे एजंट अधिकार्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेकडून सर्रास पैसे उकळत आहेत.एजंटासोबत काही अधिकारी कर्मचार्यांची मिलीभगत असल्याकारणाने सर्वसामान्य जनतेची लुट मात्र थांबताना दिसत नाही. या एजंटांचा फटका काही ट्रॅव्हल्स मालकांना बसल्यामुळे लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांमार्फत होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले.या निवेदनात प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा असलेला मुक्त वावर यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आणि नाहक मानसिक त्रास होत आहे. अशा सर्व दलालांना कार्यालयात येण्यास त्वरित पायबंद घालावा. यासोबतच जनतेच्या सोयीसाठी कार्यालयामार्फत पूर्ण वेळ मदत कक्ष स्थापन करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक संरक्षण समितीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांच्याकडे केली आहे.त्यामुळे लातूर मध्ये ट्रॅव्हल्स मालक आणि आरटीओ एजंटामध्ये वाद टोकाला गेला असून
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.याआधीच एका अमदाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत काही अधीकार्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याचाच तर हा परिणाम नाही ना..?अशा दबक्या आवाजात कार्यालयाबाहेर चर्चा होत आहे.या वादामुळे नेमक्या कोणत्या अधिकार्याचा बळी जाणार हे मात्र वेळच ठरवणार आहे.त्यातच आता नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक संरक्षण समितीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांच्याकडे दिलेल्या निवेदना पाठीमागे एजंटच असल्याचे आता उघड बोलले जावू लागल्यामुळे वाद आणखीनच वाढत चालला आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांचा कार्यकाल वादग्रस्त होत असून याचा आवाज टिसी कार्यालय आणि आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहंचल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले निवेदन
प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा असलेला मुक्त वावर यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आणि नाहक मानसिक त्रास होत आहे. अशा सर्व दलालांना कार्यालयात येण्यास त्वरित पायबंद घालावा. यासोबतच जनतेच्या सोयीसाठी कार्यालयामार्फत पूर्ण वेळ मदत कक्ष स्थापन करावा अशा मागणीचे लेखी निवेदन असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे. 
ग्राहक संरक्षण समितीचे निवेदन ...
 जिल्ह्यातून जवळपास २०० हून अधिक ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करतात. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. शिवाय, मनमानी शुल्क आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते, अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवर ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. नियमानुसार त्यांची पार्किंग व्यवस्था नाही, ऑल इंडिया परमिट घेतले जाते, होती.तशी कार्यालये नाहीत. त्यांच्या कार्यालयात प्रवाशांना स्वच्छतागृहाची सोय नाही. शिवाय, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.वाहनांची तपासणी करून फिटनेस, विमा, पीयूसी, वाहन परवाना, टॅक्स, आरसी बुक आदींची तपासणी करण्यात यावी, नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे
यावेळी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम चव्हाण, शहराध्यक्ष संतोष पोतदार, खंडू बरमदे, महेश तोंडारे, अमोल अभंगे, जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख, खाजा शेख, साबेर काजी आदींची उपस्थिती

Previous Post Next Post