गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आर.टी.ओ कार्यालयात 'नकली' मदत कक्षाची स्थापना..!
ज्या एजंटामुळे 'हप्तेखोरीचे' रामायण घडले तोच एजंट कार्यालयात रांगेमध्ये
लातूर/प्रतिनिधि
सर्वसामान्यांची आर.टी.ओ कार्यालयात सुरु असलेली दलालामार्फत लुट बंद करण्यात यावी व जनतेच्या मदतीसाठी एक मदत कक्ष स्थापन करण्यात यावा यासाठी लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले होते,निवेदनाच्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी काही मागण्या मान्य केल्या त्यानंतर लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनला दिलेल्या पत्रा मध्ये सध्दा नागरिकांना सदर सेवेची किंवा इतर माहिती देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे माहिती कक्ष स्थापन करुन तेथे सहा मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यता आले असल्याचे सांगीतले.तसेच कार्यालयाच्या आवारात व प्रत्येक विभागाच्या समोर नागरिकांच्या माहितीसाठी जागोजागी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. परिवहन विभागाकडून कोणाताही अधिकृत दलालाची नेमणुक करण्यात आलेली नाही.आपले कामकाज करण्यासाठी मोटार वाहन धारकाचे प्रतिनिधी, परवानाधारक, अनुज्ञप्तीधारक, चालक प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी, डिलर्स प्रतिनिधी, मोटार वाहन कर भरण्यास आलेले नागरीक, मोटार वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यात करता आलेले चालक मालक, मोटार मालक संघ, टॅक्सी / अॅटोरिक्षा संघटना यांच्या विविध कामासाठी किंवा भेटण्यासाठी आलेले प्रतिनिधी, मोटार वाहन मालक यांची नेमलेले प्रतिनिधी, या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीचे स्वतःचे कोणतेही काम नाही अशा व्यक्तींना कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
मात्र हे सर्व कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे.विशेष म्हणजे ज्याठिकाणी मदतकक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे त्याठिकाणी तर चितपाखरुही बसत नाही,तिथे तिन खुर्च्या बेवारस अवस्थेत पडून असुन नियुक्त केलेले जनसंपर्क अधिकारी व
सहा मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी हे मदत कक्षाला कुलुप लावून गायब असल्याचे वास्तव समोर आले आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याएजंटांच्या नावाने हप्तेखोरीचे रामायण घडले तेच एजंट कार्यालयात रांगेमध्ये बिनधास्त पणे लोकांची लुट करत आहेत अधिकारी मात्र नकली मदत कक्ष स्थापन करुन मस्त मलिदा लाटत असल्याची जोरदार चर्चा आर टी ओ कार्यालयामध्ये होत आहे.
कामकाज करण्यासाठी मोटार वाहन धारकाचे प्रतिनिधी, परवानाधारक, अनुज्ञप्तीधारक, चालक प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी, डिलर्स प्रतिनिधी, मोटार वाहन कर भरण्यास आलेले नागरीक, मोटार वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यात करता आलेले चालक मालक, मोटार मालक संघ, टॅक्सी / अॅटोरिक्षा संघटना यांच्या विविध कामासाठी किंवा भेटण्यासाठी आलेले प्रतिनिधी, मोटार वाहन मालक यांची नेमलेले प्रतिनिधी, या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीचे स्वतःचे कोणतेही काम नाही अशा व्यक्तींना कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले असले तरी मात्र वास्तव हे धक्कादायक आसून एजंटांनी पुन्हाएकदा कार्यालय गच्च भरले आहे.दिवसामध्ये गाङयांचे पासिंग करुन घेणे आणि रात्री हिसाब करणे हे नित्यनियमाचे झाले आहे.यावर आता अंकुश केंव्हालागेल आणि लातूरची बदनामी केंव्हा थांबेल हे वेळच ठरवेल.