Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेला इजिप्त येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेला इजिप्त येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची जाण ठेवून हा पुरस्कार त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेतर्फे महिला मेळावा 


ग्लोबल सेंटर फॉर अडॅप्टेशन (GCA युके बेस) ऑर्गनायझेशनच्या वतीने स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेला इजिप्त येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हवामान बदलावर आधारित पर्यावरण पूरक शेती मॉडेल साठी हा पुरस्कार मिळाला असून यामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची जाण ठेवून हा पुरस्कार त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने मुक्ताई मंगल कार्यालय लातूर येथे शेतकरी महिला मेळावा दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाला.

 मेळाव्याला लातूर येथील ग्रामीण भागातून 247 पेक्षाही अधिक महिलांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी श्री. सुभाष चोले जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, श्री. सचिन डिग्रसे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र लातूर, श्री. साकेब सर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर, श्री. भास्कर मणी चीफ मॅनेजर क्रेडिट एसबीआय, श्री. मनोज सूर्यवंशी रिजनल बिजनेस ऑफिसर SBI लातूर , श्रीमती अंजली गुंजाळ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र लातूर, श्री उद्धव फड जलजीवन मिशन जिल्हा परिषद लातूर , श्री. संभाजी देशमुख उपसंपादक दैनिक सकाळ या मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप संस्थेचे डायरेक्टर प्रोग्राम उपमन्यू पाटील सर यांनी केले, तसेच सूत्रसंचालन सौ. सुनिता पाटील हुडे यांनी केले तसेच मेळाव्यामध्ये स्वयम् शिक्षण प्रयोग च्या विविध कार्यक्रमांची माहिती श्री दिलीप धवन व श्रीमती तबस्सुम मोमीन यांनी विस्तृतपणे दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राजाभाऊ जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग मधील सर्व कर्मचारी वर्ग यांचा समावेश होता.
स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे संचालक उपमन्यू पाटील 



"तीन लाख महिलांना पुरस्कार समर्पित जगातील 150 संस्था मधून आपल्या संस्थेला पुरस्कार मिळाला आहे 15 लाख रोख व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापक संचालिका स्वर्गीय प्रेमा गोपालन व संस्थेसोबत जोडलेल्या तीन लाख महिलांना समर्पित करत आहोत. असे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे संचालक उपमन्यू पाटील म्हणाले."
Previous Post Next Post