Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जुन्या एमआयडीसी परिसरातील कोट्यवधीचा भूखंड बोगस संस्थेच्या नावावर हडपला

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जुन्या एमआयडीसी परिसरातील कोट्यवधीचा भूखंड बोगस संस्थेच्या नावावर  हडपला

लातुरातील  २१ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
आरोपींची जामिनासाठी धावाधाव : अद्याप कोणालाही अटक नाही

लातूर :लातूर मध्ये वरिष्ठ अधिकारी नुसते नावालाच आहेत का...?प्रत्येक गंभीर प्रकरणांमध्ये तक्रार दात्यांना न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागत आहे.अशाच एका गंभीर आणि धक्कादायक प्रकरणांमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे एमआयडीसीचे आरक्षित भूखंड बळकावल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर शनिवारी (दि.३) रात्री उशिरा शहरातील २१ धनाढ्य व्यापाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

"लातूर मध्ये वरिष्ठ अधिकारी नुसते नावालाच आहेत का...?महिन्याची पगार घेण्यासाठीचं फक्त कार्यालयामध्ये येतात का? त्यांची काही सामाजिक बांधीलकी नाही का?सदसदविवेक बुध्दि अशा या अधिकार्यांनी विकुन खाल्ली का..?अशा तिव्र भावना लातूरच्या सर्वसामान्य जनतेकडून उमटत आहेत. प्रत्येक गंभीर प्रकरणांमध्ये तक्रार दात्यांना न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागत आहे.विशेष म्हणजे गुन्हादाखल करण्यात आलेले व्यापारी हे लातूरच्या व्यापार क्षेत्रामध्ये महत्वाची भुमिका बजावत असतात.अशे व्यापारी जर गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करत असतील आणि त्याला अधिकारी वर्गाची साथ लाभत असेल तर लातूरमध्ये गुन्हेगारी कशी कमी होणार...?याबाबत शंका व्यक्त होत आहे.आज लातर चे नाव शिक्षणामुळे आणि व्यापारांमुळे देशात प्रसिद्ध होत आहे,परंतू मागील काही वर्षापासून हे दोन्ही क्षेत्रामध्ये गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्व भुमी तयार होत आहे."

शहरातील जुन्या एमआयडीसी परिसरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी १००० चौ. मीटरचा एक भूखंड उद्योग समूह / संघटनेच्या कार्यालयासाठी आरक्षित होता. हा भूखंड हाडपण्याच्या उद्देशाने शहरातील २१ व्यापाऱ्यांनी एकत्र येत 'लातूर जिल्हा उद्योग समूह' या नावाची संस्था/संघटना अस्तित्वात असल्याचे भासवून एमआयडीसीकडे बनावट कागदपत्रे दाखल केली.या २१ व्यापाऱ्यांमध्ये शहरातील चंदुलाल बालकृष्ण बलदवा,प्रकाश संपतलाल शर्मा, व्यंकटराव मुकुंदराव गर्जे, सुनील हरिनारायण लोहिया, अजय देविदासराव निलेगावकर, रतनलाल नंदलाल बिदादा, मधूसुदन जगन्नाथ सोनी, बसवणअप्पा लिंगणअप्पा पाटणकर, भारत त्रिंबकराव माळवदकर, जयप्रकाश बाळकिशन खटोड, मल्लिकार्जुन रेवणसिध्दप्पा जवळे, शिरिष लक्ष्मीनारायण भुतडा, अशोक श्रीनिवासजी कलंत्री, हेमंद द्वारकादासजी नावंदर, प्रवीण गोपीनाथ पेन्सलवार, योगेश जगन्नाथ तोतला, रवींद्र ईश्वरप्रसाद राठी, श्रीनिवास जयवंतराव मोरलावार, जुगलकिशोर बालकिशनजी यंत्रणा याला दाद देत नसल्यामुळे शहरातील चंदूलाल बालकृष्ण तापडिया, चंद्रकांत रामेश्वर काळे, अखेर त्यांनी न्यायालयीन लढा बलदवा, प्रकाश संपतलाल शर्मा, गिरधारी रामकृपाल तिवारी यांचा समावेश आहे. उभारला या व्यापाऱ्यांना एमआयडीसीने त्यांनी दि. ११ फेब्रुवारी २०१२ रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे जुन्या एमआयडीसी परिसरातील पी-१० हा १००० चौ. मीटरचा भूखंड दिला. वास्तविक ज्यावेळी हा भूखंड या व्यापाऱ्यांना मिळाला, त्यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयात 'लातूर जिल्हा उद्योग समूह' या नावाची संस्थाच नोंदणी नव्हती. त्यामुळे संभाजी सेनेने यासंदर्भात आंदोलन उभारले; परंतु कोणतीही यंत्रणा याला दाद देत नसल्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयीन लढा उभारला आणि लातूरच्या मुख्य
न्यायदंडाधिकाऱ्यांनी कलम १५६ (३) अन्वये आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांत गुरनं ६९९/ २२ कलम ४२०, ४६५, ४६८, ४६७, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही - अटक करण्यात आलेली नसून आरोपोंनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
Previous Post Next Post