Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जानेवारी मध्ये होणार्या लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती विषयी माहिती

जानेवारी मध्ये होणार्या लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती विषयी माहिती



लातूर जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस भरती २०२१ जाहिराती मध्ये नमुद प्रमाणे प्रवर्गनिहाय (२९) रिक्त पदांच्या भरती

प्रक्रियेची "कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" ही दिनांक ०२.०१.२०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजता पासून ते दिनांक ०९.०१.२०२३ रोजी पर्यंत पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे होणार आहे. संबंधीत उमेदवारांना महा आयटी यांचेकडुन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर प्रवेशपत्रावर उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व शारिरीक चाचणीस कोणत्या तारखेस हजर रहावयाचे आहे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या तारखेस पोलीस मुख्यालय, लातूर येथे पोलीस भरती प्रक्रियेसाठी हजर रहायचे आहे. उमेदवार दिलेल्या तारखेस पोलीस भरतीच्या कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीस उपस्थित न राहिल्यास त्यांना नंतर संधी देण्यात येणार नाही.

"कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी रोजच्या रोज या कार्यालयाचे संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वरती प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच त्याची एक प्रत पोलीस मुख्यालय कार्यालय, लातूर व पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील दर्शनी भागावर डकविण्यात येणार आहे.

"कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" करीता उमेदवारांसाठी महत्वाच्या सुचना :-

१) लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रियेतील "कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" करीता उमेदवारांनी प्रवेश पत्रामध्ये नमुद तारखेस व वेळेस पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर या ठिकाणी हजर रहायचे आहे.

२) "कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" करीता बोलाविण्यात आलेल्या तारखेस उमेदवार गैरहजर राहिल्यास, अशा गैरहजर राहणारे उमेदवारास अपात्र घोषीत करण्यात येणार आहे. तसेच गैरहजर राहणारे उमेदवारांची कोणत्याही सबबीवर परत कागदपत्रे पडताळणी व शारिरीक चाचणी घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

३) "कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी" करीता उमेदवारांनी ऑनलाईन भरलेला मूळ आवेदन अर्ज व परीक्षा

प्रवेश पत्र सोबत घेऊन यावे. अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. ४) उमेदवाराने ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर रद्द होऊ शकेल तसेच उमेदवाराने मागितलेले सामाजिक/समांतर आरक्षण अथवा वयोमर्यादा शिथील करणे इत्यादी मधील बदल सवलती नामंजूर करण्यात येतील.

५) उमेदवारांनी सोबत नजीकच्या काळातील (०.४) पासपोर्ट साईज कलर फोटो घेऊन यावे. ६) उमेदवारांनी ओळखपत्र आधार कार्ड, पैन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र इत्यादी पैकी सोबत आणावे.. (७) उमेदवारांना चाचणीकरीता मोबाईल, बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तु इत्यादीसह इतर कोणतेही साहित्य सोवत घेऊन येण्यास सक्त मनाई

करण्यात येत असून, त्यांना सदरचे साहित्य सोबत घेऊन मैदानावरती प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी सोबत येताना

कोणतेही साहित्य घेऊन येवु नये. आणल्यास उमेदवाराने त्यांचे स्वतःचे जिम्मेदारीवर सदरचे साहित्य कोठे ठेवायचे हे त्यांनी ठरविण्यात यावे.

उमेदवाराने आणलेले साहित्य जमा करणे व सांभाळणे ही जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची नोंद घ्यावी.

८) उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या आवेदन अर्जामध्ये नमुद केल्यानुसार सर्व शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे, जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वाहन चालक (LMV/ LMV-TR) वैध परवाना, EWS प्रमाणपत्र व इतर प्रवर्गनिहाय आवश्यक असलेली सर्व मुळ प्रमाणपत्रे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (सन २०२१-२२ २०२२-२३ सह दि.३१.०३.२०२३. दि.३१.०३.२०२४ व दि.३१.०३.२०२५ पर्यंतचे वैध असलेले, दि. ३०.११.२०२२ पर्यंत निर्गमित केलेले असावे), खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता ३०% आरक्षणाच्या सवलतीकरीता उन्नत व्यक्ती / गट (क्रिमीलेअर) मध्ये मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट "फ" प्रमाणपत्र व सर्व मुळ प्रमाणपत्राच्या छायांकित सत्य प्रत सोबत घेऊन यावे.

९) कागदपत्र पडताळणीच्या वेळी आवेदन अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आढळल्यास उमेदवाराला त्याचवेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र केले जाईल. १०) सदरची भरती प्रक्रिया पारदर्शक, तटस्थपणे, निःपक्षपातीपणे होणार आहे. करिता उमेदवाराने कोणत्याही भुल थापास अथवा आमिषास बळी

पडु नये असे काही आढळल्यास आल्यास त्याची माहिती पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर व पोलीस अधीक्षक,

लातूर यांना तात्काळ निदर्शनास आणून देण्यात यावी. ११) सदर लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२१ मध्ये उमेदवारांचा काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्यांनी दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२२९६ वरती तसेच या कार्यालयाचे ई-मेल आयडी sp.latur@mahapolice.gov.in पर सविस्तर आक्षेप नोंदविण्यातयावा. 
टिप: 
सदर भरती प्रक्रिये दरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रथमता कागदपत्रे पडताळणी व शारिरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल व त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांचीच शारिरीक क्षमता (धावणे व गोळा फेक) चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणीकरिता प्रत्येक टप्यावर पात्र उमेदवारांस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. म्हणुन सदर भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी त्यांची शारिरिक चाचणी पुर्ण होई पर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे हजर रहावे लागेल या पूर्व तयारीनिशी यावे लागेल.


Previous Post Next Post