महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन
लातूर, दि. 29 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहेत. यानिमीत्त राज्यात स्पर्धेची माहिती पोहोचविण्यासाठी 30 डिसेंबर रोजी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथेही 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा ज्योत रॅलीला गंजगोलाई येथून सुरुवात होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल), छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर लातूर विभागातील क्रीडा ज्योग उस्मानाबादमार्गे पुणे येथील विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य क्रीडा ज्योत रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचणार आहे.
जिल्ह्यातील केंद्र व राज्य पुरस्कारप्राप्त खेळाडू, संघटक व प्रशिक्षक यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व खेळांच्या एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तरी शहरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय क्रीडा ज्योत रॅली आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे