गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बनावट कागदपत्रांआधारे कर्जघेतलेल्या रो-हाऊसेसची केली विक्री !
हिरकणी डेव्हलपर्सच्या संचालकावर गुन्हा दाखल
"लातूर मध्ये पोलिसांचे कार्य हे नेमके काय आहे हे से सर्वसामान्य जनतेला कळणे मुष्कील झाले आहे.विशेषकरुन शिवाजी नगर पोलिसांनी अशा गंभीर घटने बाबत सततर्कता दाखवणे आवश्यक असताना फिर्यादिला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागतों हे अतिशय दुर्दैवी असून यावर पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी वेळीच लक्ष घालने अवश्यक बनल्याचे सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे."
लातूर :हिरकणी डेव्हलपर्स'च्या संचालकाने कर्जापोटी बँकेकडे तारण असलेले रो-हाऊसेस बनावट ७/१२ जोडून ' रो हाऊसची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला असून. या प्रकरणी रो-हाऊसच्या मालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत 'हिरकणी'चा संचालक गणेश ईश्वरअप्पा गवारे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधीक माहिती अशी की, शहरातील विविध भागात मे. हिरकणी डेव्हलपर्स, लातूर यांच्या वतीने बांधकाम करुन निर्मिती केलेली घरे विक्री करण्यात येतात. याचा मालक गणेश ईश्वर अप्पा गवारे (वय ३८, रा. मोतीनगर, लातूर) हा असून या फर्मचे सर्व व्यवहार गवारे हाच करती, गणेश गवारे याने शहरातील खाडगाव रोड येथील
गट क्र ६८ मध्ये (सरस्वतीनगर) 'गजानन विहार' नावाच्या ८ रो-हाऊसेसची निर्मिती केली आणि ही प्रॉपर्टी दि. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड, शाखा गंजगोलाई लातूर येथून ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासाठी त्याने दि. ३० मार्च २०१५ रोजी या जागेचे सदर बँकेला गहाणखत करुन दिले. कालांतराने या गजानन विहार मधील १ ते ८ रो-हाऊसची विक्री केली.
....विक्री करताने रो-हाऊस विकत घेणाऱ्यांना ही प्रॉपर्टी निर्विवाद असून यावर कसलाच बोजा नाही असे खोटे सांगीतले. तसेच, त्यांना खरेदीखत करुन देत असताना बोजा नसलेला बनावट ७/१२ जोडला आणि ग्राहकांची व दुय्यम निबंधक कार्यालयाचीही फसवणुक केली. कालांतराने गवारे याने दि. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेकडून
घेतलेल्या ७५ लाखांच्या कर्जाची जाणिवपूर्वक परतफेड केली नाही. त्याने दि. १९ मार्च २०१८ रोजी या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर रो-हाऊसेसवर नोटीसा डकविल्या. त्यानंतर येथील रो-हाऊस मालकांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गवारे याची भेट घेवून याचा जाब विचारताच मी अडचणीत असल्यामुळे कर्ज घेतल्याचे कबुल करुन हे कर्ज लवकरच परतफेड करणार असल्याचे सांगीतले. यावर विश्वास ठेवून येथील रो-हाऊस मालकांनी काही काळ वाट पाहिली असता त्याने कजांची परतफेड केली नाही. त्यामुळे, या रहिवाशांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली परंतु, शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. यावर लातूर न्यायालयाने शिवाजीनगर पोलिसांना कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्ह दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाने शिवाजीनगर पोलिसांत गणेश गवारे याच्या विरोधात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.