ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणी असल्याचे कारणाने वाहतुक मार्गात बदल .....
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणी महिला तंत्रनिकेतन,बार्शी रोड, लातूर येथे असल्याचे कारणाने मतमोजणी कामी लातूर तालुक्यातील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे एकत्र जमून मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन जनतेच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने बार्शी रोडकडुन लातूर शहरात येणारी वाहतुक व लातूर शहरातून बार्शी रोडने जाणारी वाहतुकचे मार्गात खालीलप्रमाणे बदल करणे आवश्यक असल्याने दि.20/12/2022 रोजी सकाळी 06.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गावर वाहतुक वळविण्यात येत आहे.अ) दि.20/12/2022 सकाळी 06.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
1) बार्शी रोडकडुन लातूर शहरात येणारी वाहतुक सरळ न येता रेल्वे ब्रिजपासून स्व.विलासराव देशमुख (पॅरलल रोड) मार्गे वळून पाच नंबर चौक मार्गे जाईल.
2) लातूर शहरातून बार्शी रोडकडे जाणारी वाहतुक हि पाच नंबर चौकातून सरळ न जाता वळून स्व.विलासराव देशमुख (पॅरलल रोड) मार्गे बार्शी रोड उड्डाणपूलमार्गे जाईल.
तरी सर्व नागरीकांनी दि.20.12.2022 सकाळी06.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गावर वाहनांचा वापर टाळून प्रशासनास सहकार्य करावे.