Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पिंपरी-चिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 पिंपरी-चिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या

  प्रतिनिधी/ पिंपरी-चिचवड/दादाराव कांबळे
पिंपरी-चिंचवड चिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या, - पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अगदी अल्पवयीन मुलांपासून गँगवारच्या घटना घडत आहेत अशीच एक घटना काल चिंचवड भागातील मोहननगर येथील विशाल गायकवाड या ३९ वर्षीय सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे.पिंपरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या रामनगर येथील परशुराम चौकात विशालवर गोळीबार करत धारदार शस्त्राने वार करत विशाल गायकवाड उर्फ गिड्या याची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. या हत्याकांड प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असुन. गिड्या उर्फ विशाल एका चौकात उभा असताना मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आधी गोळीबार करण्यात आला व त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.जुन्या वादातून हा खुन करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून केला जात आहे. पूर्वनियोजित हल्ला असल्याची चर्चा पसरली असुन समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास विशाल हा एका चौकात उभा होता. त्यावेळी आठ जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. त्यातील एकाने विशालवर आधी गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यात आले.
Previous Post Next Post