गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मारहाण प्रकरणात प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या नावाची बदनामी करण्याच्या हेतूने मिडीयाचा वापर
नांदेड(प्रतिनिधी)- प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या नावाची बदनामी करण्याच्या हेतूने मिडीयाचा वापर करुन दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचे समोर येत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीवरून एका महिलेच्या तक्रारीवरून प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची बातमी प्रकाशीत झाली परंतू ज्या सेवकाने महिलेस मारहाण केली तो सेवक प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक बियाणी यांच्याकडे काम करत नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे निव्वळ खोडसाळपणा आणि बदनामीच्या उद्देशाने तक्रारीमध्ये नाव टाकण्यात आल्याचे जोरदार चर्चा संपुर्ण नादेड शहरामध्ये होवू लागली आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत 27 डिसेंबर रोजी दुपारी नागार्जुन हॉटेलजवून जात असतांना एका ऍटोने त्यांना कट मारला. याबाबत विचारणा केली असता ऍटोमधील लोकांनी त्या महिलेला ऍटोत कोंबून सोबत नेले आणि लाकडी बांबुने मारहाण करून सायंकाळी सोडून दिले.
"नेमके त्या महिलेने कोणाच्या सांगण्यावरून तक्रारीत नाव टाकले हे तपासात निष्पन्न होईलच परंतू अशा प्रकारे एखाद्याची बदनामी करने अतिशय चुकिचे असून पत्रकार संपादकांनीही अशा प्रकरणामध्ये माहिती घेवून छापावे जेनेकरुन कोणावरही अन्याय होणारनाही असे प्रसिध्दी माध्यमातील जानकारांनी मत व्यक्त केले आहे".
शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 454/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 365, 324, 109, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच शिवाजीनगर पोलीसांनी तक्रारीतील मुजाहित अब्दुल खादर पठाण, त्याची पत्नी अंजुम बेगम
मुजाहित पठाण, ऍटो चालक समिर मुर्तुजा पंजारीआणि
तनिजाबी उर्फ मुन्नीबाई बाबू शेख असे दोन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे.
Tags:
Crime News