गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पिंपरी चिंचवड शहरात गोळीबार ...आठ राऊंड फायर
प्रतिनिधि/दादाराव कांबळे
पिंपरी चिंचवड शहर आहे का... बिहार. पिंपरी चिंचवड शहरात गोळीबार .गोळिबार करून 8 गोळ्या हवेत झाडल्या. शुल्लक कारणांवरून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे
मंगळवार दि6डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्या असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.या घटना पिंपरी चिंचवड शहरातील भाट नगर लिंक रोड वर पत्राशेड येथे घडली आसून हवेत 8 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . . शुल्लक कारणांवरून गोळी बार केल्याची माहिती मिळत आहे. एका रिक्षातून येऊन गोळीबार केला आसून हा गोळीबार कोणत्या उद्देशाने केला आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. आशा या घटनेनंतर हे पिंपरी चिंचवड आहे की ? युपी बिहार असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.