पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांच्या असभ्य वक्तव्याचा समाचार घेत लातूरमध्ये भाजपाने पाकचा ध्वज जाळून केला निषेध
आ. निलंगेकर, आ. कराड यांची उपस्थितीत
लातूर दि.१७ - पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांच्या असभ्य वक्तव्याचा समाचार घेत जाहीर निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपाचे नेते आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करून बिलावल भुट्टो याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी जगातील लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या बद्दल असभ्य वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभर संतापाची लाट निर्माण झाली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी सकाळी भाजपाचे नेते आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली, त्याचबरोबर परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भारत माता की जय, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय हाय, जिंदाबाद जिंदाबाद हिंदुस्थान जिंदाबाद, मोदीजी का अपमान नही सहेगा हिंदुस्तान अशा विविध घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला. यावेळी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हा अपमान केवळ नरेंद्रजी मोदी साहेब यांचा नसून देशातील प्रत्येक नागरिकांचा आहे असे सांगून असे वक्तव्य करण्याची हिम्मतच कशी होते असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान यांच्या अपमानाचा देशवासियांनी एकजुटीने विरोध करायला हवा. काँग्रेस वाल्यांनी साधा निषेध केला नाही. सतत पाकिस्तानला पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसवर कडाडून टीका केली.
या आंदोलनाच्या वेळी भाजपाचे प्रदीप पाटील खंडापूरकर, शैलेश गोजमगुंडे, प्रेरणा होनराव, दिग्विजय काथवटे, अजित पाटील कव्हेकर, बन्सी भिसे, चंद्रसेन लोंढे, गोविंद नरहारे, सुरज शिंदे, मीनाताई भोसले, निर्मला कांबळे, सुरेखा पुरी, राम बंडापल्ले, श्याम वाघमारे, विपुल गोजमुंडे पांडुरंग बालवाड, प्रताप शिंदे, गोपाळ पाटील, शंकर चव्हाण, ज्ञानेश्वर जुगल, सुमन राठोड, प्रगती डोळसे, शोभा कोंडेकर, ज्योती मार्तंडे, अफ्रीन खान, गोपाळ पवार, विनायक मगर, धनंजय जाधव, बाबा भिसे, अण्णा पाटील, समाधान कदम, गणेश बोंद्रे, मुन्ना हाश्मी, संजय गिरी, किशन बडगिरे, राजकुमार गोजममुंडे, अरुण जाधव, सचिन मदने, वाजिद पठाण, गणेश सुरकुटे, संतोष तिवारी, गजेंद्र बोकन, कमलाकर डोके, फफागिरे सर, काशीम पठाण, सुनील राठी, राहुल भुतडा, प्रवीण जोशी, भरत जाधव, महादेव पिठले, ईश्वर कांबळे, विशाल हवा पाटील, प्रगती डोळसे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.