गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एका बस ड्रायव्हरने निष्काळजीपणे बस चालवून, बसमधील शाळकरी मुलींचा जिव घातला धोक्यात
पुणे/सह संपादक- दादाराव कांबळे
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये सध्या क्राईम चे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. एकीकडे खून मारामाऱ्या आणि हवेत बंदुकीच्या गोळ्या मारणारे गुन्हेगार पोलीसांची डोकेदुखी वाढवताना दिसतात त्यातच आता शाळकरी मुली देखील या शहरात भीतीच्या वातावरणात जगताना दिसत आहे,एका सरफिर्या बस ड्रायव्हरने बसमधील शाळकरी मुलींचा जिव धोक्यात घालत अतिशय निष्काळजी पणे,गाडी मध्ये मोठ्याने गाण्यांचा आवाज करत मुलींकडे पाहून मोठमोठ्याने गाने मनत गाडी चालवून जिव धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना घडली . ही घटना गुरूवार दि.8 डिसेंबर रोजी 12:30 ते 1.30 च्या दरम्यान खराळवाडी, पोतदार शाळे मागील बाजुस घडली असून.
याबाबत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
त्यानुसार पिंकु कुमारवय-30, या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी या शाळा सुटल्यानंतर स्कुल बस मधुन घरी जात असतांना रोज बस चालक आरोपी पिंकु कुमार याने बस चालु करुन मोठ मोठ्याने गाणी सुरु करत असे फिर्यादी व फिर्यादी यांच्या मैत्रीणी यांनी आरोपीस आवाज कमी करण्यास सांगितले असता आरोपी म्हणाला की, तुम्हाला काय करायच आहे, मी मोठ-मोठ्याने गाणी लावणारच, व फिर्यादीकडे बघुन गाणी म्हणु लागला. दरम्यान आरोपी पिंकु कुमारला कोणाचा तरी फोन आला तो फोन वर मोठ-मोठ्याने बोलू लागला त्यावेळी फिर्यादी हे आरोपीला आवाज कमी कर असे म्हणाले असता आरोपीने रागाने फोन कट करुन चालु बस मधुन फोन बाहेर फेकुन दिला व बस वेगाने चालवु लागला. आरोपीने एवढ्या वेगात बस चालवली की बस खराळवाडी पोतदार शाळेचे मागील बाजुस धडकता धडकता वाचली व बंद पडली.सर्व मुले घाबरुन बसमधुन खाली उतरत असताना आरोपी याने आम्हाला बस मधुन उतरु दिले नाही. त्यावेळी रस्त्याने जाणा-या एका गाडीवाल्याने आरोपीस सांगितले की, बसच्या मागुन धुर निघत आहे. त्यानंतर फिर्यादीची मैत्रिण ही आरोपी याला जोरात म्हणाली की, तु काय केलं? आमच काही झालं असतं तर ? त्यावर आरोपी हा फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण यांच्या एकदम जवळ अंगावर आला व आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीचा डावा हात पकडुन म्हणाला की, आता तुम्ही काय करणार, तसेच फिर्यादीच्या खाद्यांला हात लावुन फिर्यादीस त्याचे छातीजवळ घेऊन फिर्यादीस बँड टच केले. त्याने केलेल्या टचमुळे फिर्यादीस घाण वाटली.आरोपी पिंकु कुमारवर पोलीसानी भारतीय दंड विधान कलम 354, 279 बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी पिंकु कुमार याचा पिंपरी पोलीस शोध घेत आहेत.