Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये रूग्णालये सज्ज ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

लातूर मध्ये रूग्णालये सज्ज ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

खाजगी, शासकीय रूग्णालयाची माहिती तात्काळ देण्याच्या सूचना


लातूर :चीन मधील कोरोनाचा झालेल्या उद्रेकी मुळे भारतात दक्षता बाळगली जात आहे त्यामुळे लातूरमध्येही प्रशासनाने खाजगी व शासकीय रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश शनिवारी (दि. २४) व्हीसीद्वारे जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय, रूग्णालयांतील उपलब्ध साधनसामग्रीचा तपशील तात्काळ ऑनलाईन जिल्हा परिषदेकडे सादर तो पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सतर्क राहून लसीकरण करून घेणे, हे मुख्य उद्दिष्ट हाती घेण्यास सांगितले असून, दुसरा, बुस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांना तात्काळ डोस देण्याची कार्यवाही हाती. 'घ्यावी. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएच) सर्व रूग्णालयात सज्ज ठेवण्यासह त्या रूग्णालयात असलेला ऑक्सिजन, औषध गोळ्या, बेड, स्टाफ

याची माहिती भरून पाठविण्यास सूचविले आहे. याउपर, काही साधनसामग्री उपलब्ध नसेल तर त्याची तात्काळ मागणी नोंदवून त्वरित तोडगा काढून येणाऱ्या संकटावर .मात करता येईल. आता पूर्वीसारखेच कोरोनाचे नियम पाळून संपर्क ठेवण्याची आचारसंहितेचा अंमलात आणावी लागणार असून, सध्या टेस्टचे प्रमाण नगण्य आहे. ते वाढवून संशयित रुग्णांनांची टेस्ट कोणत्याही परिस्थितीत झाली पाहिजे, यावर आरोग्य विभागाने भर द्यावा. येऊ घातलेले कोरोना संकट थोपविण्यासाठी प्रशासकीय समन्वय, खाजगी रूग्णालयाशी समन्वय ठेवून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नव्याने उद्भवलेल्या कोरोना संकटावर केवळ लसीकरण हा एकमेव पर्याय असून, नागरिकांनी सतर्क राहून गर्दी जाणे, हस्तांदोलन करणे हे टाळावे, असे व्हीसीद्वारे आरोग्य संचालक डॉ. नितीन हस्तगत करा. तसेच काही अडचणी आंबाडेकर, राज्यस्तरीय रोग सर्व्हेक्षण असतील तर त्या सांगाव्यात, त्यावर विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटी यांनी सांगितले

लातूर जिल्ह्यात दररोज किमान ३५० टेस्ट करणे अपेक्षित आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव ओसरल्याने टेस्टचे प्रमाण नगण्य आहे. सर्दी, पडशे किंवा संकेत दिसणाऱ्या नागरिकांनी तात्काळ टेस्ट करून खातरजमा करावी. अलीकडे टेस्टची टक्केवारी बरीच खाली आहे. ती वाढवावी, अशा सूचना आहेत.

जिल्ह्यात परिस्थिती सामान्य

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल, या शंकेपोटी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. लसीकरण करून सुरक्षित राहणे हा त्यावरील एकमेव पर्याय असून, लातूर • जिल्ह्यात सध्या तरी सामान्य परिस्थिती आहे. चिंताजनक चित्र निर्माण झालेले नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले.
Previous Post Next Post