गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी चाकूर व अहमदपूर उपविभाग हद्दीत पोलिसांचे मध्यरात्री कोंबिग ऑपरेशन
लातूर- आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अपप्रवृत्तीना आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 7 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निकेतन कदम यांचे नेतृत्वात उपविभाग चाकूर व अहमदपूर पोलिसा कडून दोन्ही उपविभाग हद्दीत कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी मार्गदर्शन करून उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचे नेतृत्वात दोन्ही उपविभागातील 5 अधिकारी व 27 पोलीस अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. कोंबिग ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र जप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे,अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता.
त्यानुसार चाकूर व अहमदपूर उपविभागातील पोलिसांनी उपविभाग हद्दीतील लॉजेस व हॉटेल तपासले आहेत. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या 12 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आलेली आहे. तसेच उपविभागात नाकाबंदीचे आयोजन करून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्ड वरील सराईत 13 गुन्हेगारांना चेक करण्यात आले.अवैध दारु विक्री करणाऱ्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन मध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कोंबींग ऑपरेशनमध्ये उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, व अंमलदार सहभागी झाले होते.