गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
तब्बल पन्नास वकिलांनी शाई फेकणार्यांचे घेतले मोफत वकिलपञ
पुणे/सह-संपादक-दादाराव कांबळे
पुणे :पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करणाऱ्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांवर चिंचवड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समता सैनिक दलाचे मनोज भास्कर गरबडे , धनंजय इजगज आणि विजय धर्मा ओव्हाळ असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे नाव आहे. आज रविवारी (दि.11) रोजी त्यांना स्पेशल कोर्टाद्वारे मोरवाडी कोर्टात हजर करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, तब्बल 40 ते 50 वकिलांनी या प्रकरणात वकीलपत्र दाखल केले आहे, परंतु आपली बाजू मांडताना गोंधळ नको म्हणून फक्त चौघांनी बाजू मांडण्याचा निर्णय सर्व टीम ने घेतला.यामध्ये अँड.अतुल कांबळे,अँड.सचिन भोसले, अँड. अतुल सोनवणे, अँड. उमेश गवळी हे होते.
पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली… त्यांचे म्हणणे होते की, सदर प्रकरणात अजून कोणकोण सामील आहे याचा तपास करावयाचा आहे, जप्त केलेले काळे द्रव्यची तपासणी करावयाची आहे, यामागे राजकीय हेतू आहे का, जो व्हिडिओ लीक झाला तो कोणी केला अश्या काही बाबींसाठी पोलीस कस्टडी हवी आहे.वकिलांनी अतिशय योग्य पद्धतीने आपली बाजू कोर्टात मांडली.यात प्रामुख्याने कलम 307आणि कलम 353 कलम लागू होत नाही, त्यामुळे ते बाद करण्याचा मुद्दा मांडला गेला. तसेच दुपारी ताब्यात घेऊन मध्यरात्री गुन्हा दाखल केला, तेवढा कालावधी तपासासाठी पुरेसा होता.वॉटर कलर हे जीवघेणे नाही, तसेच यात कोणतेही हत्याराचा वापर झालेला नाही, कोणतीही रिकव्हरी नाही. अश्या अनेक मुद्दे मांडले मा. सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देखील यावेळी देण्यात आले.परंतु सर्व बाजू ऐकून घेऊन मेहेरबान कोर्टाने 14 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली.यात वकिलांच्या टीम चे सर्वत्र कौतुक होत आहे.