गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यात पेटवून घेतलेल्या व्यक्ति चा मृत्यु
पिंपरी चिंचवडमधील घटना
पुणे/पिंपरी-चिंचवाड़/सह-संपादक- दादाराव कांबळे
: – बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी दि.2डिसेंबर२०२२रोजी रात्री एकाने भोसरी पोलीस ठाण्यात स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मंगळवार दि.6डिसेंबर २०२२रोजी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबरला मृत व्यक्ती 19 वर्षीय पीडितेच्या घरी गेला. पीडित तरुणी घरामध्ये एकटी असताना त्याने गैरफायदा घेतला आणि धमकी देत बळजबरीने शरीर संबंध (Physical Relationship) ठेवल्याचा आरोप तरुणीने फिर्यादीत केला आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पुन्हा घरी आला. त्याने तरुणीला माझ्याशी लग्न कर नाहीतर आजपर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते परत कर असे म्हणत वाद घातला. पीडित तरुणीने आरोपीला शिक्षण झाल्यावर लग्न करू असे सांगितले.याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले.याबाबत 1 डिसेंबरला आयपीसी 376, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्याला मोठा धक्का बसला.यातूनच त्याने भोसरी पोलीस ठाण्यात 2 डिसेंबरला स्वत:ला पेटवून घेतले.यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.