गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राठोडा गावात दरोडा ;14 लाख 60 हजार लंपास; एका रात्रीत गावातील आठ घरे फोडली
शिरूर अनंतपाळ/निलंगा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निलंगा तालुक्यातील राठोडा येथील फिर्यादी रमाकांत दरेकर यांनी घेतलेल्या प्लॉटचे पैसे देण्यासाठी आपल्या घरी रोख रक्कम बारा लाख चाळीस हजार व दीड तोळे सोने असे एकूण 14 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल आपल्या घरी ठेवले होते. परंतु मध्यरात्री अचानक दरोडा टाकून लोखंडी रॉडने अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात घुसून घरफोडी केली आहे. अज्ञात सात ते आठ चोरट्यांनी ही चोरी केली असून याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात रमाकांत दरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, राठोडा गावातील दिलीप कुंठाळे व वाघंबर सोमवंशी या दोघांचे घर फोडून घरात शिरले परंतु अचानक आवाज आल्याने घरातील लोक जागे झाल्यामुळे चोरट्यांनी तेथुन पळ काढला आणि रमाकांत दरेकर यांच्या घरातील सोने व रोख रक्कम घोरपडी करून पळून नेल्याची घटना घडली आहे. या जबर चोरीमुळे राठोडा गावात भीतीचे वातावरण पसरले असून अज्ञात चोरट्यांचा तपास निलंगा पोलीस करीत आहे.