गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारु धंद्यावर छापेमारी. जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 गुन्हे दाखल. घरफोडीचा एक गुन्हा उघड.
लातूर- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कडक कारवाई करणे बाबत निर्देशित केले आहेत.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून त्या मार्फत अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान दिनांक 12/01/2023 रोजी सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे म्हाडा कॉलनी परिसरात स्वतःच्या कारमधून विनापास परवाना विदेशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करीत असताना पोलीस पथकाला दोन इसम दिसले. पोलिसांची चाहूल लागताच सदरचे इसम पळून जात असताना पथकाने दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले व एक इसम पळून गेला. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव
1) हरजीतसिंग उर्फ पापे सरपालसिंग टाक,वय 32 वर्ष, राहणार तळहिप्परगा, गणपती घाट, तुळजापूर, जकात नाकासमोर, हगलूर, सोलापूर उत्तर सध्या राहणार महाडा कॉलनी,बाबळगाव रोड, लातूर . व पळून गेलेल्या इसमाचे नाव
2) करण सिंग लक्ष्मण सिंग बावरी राहणार संजय नगर लातूर .
असे असल्याचे सांगितले.
हरजीतसिंग याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील कारची पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूचे वेगवेगळ्या कंपनीचे बॉक्स व बाटल्या मिळून आल्या त्यावरून पथकाने दारूचा मुद्देमाल आणि कार सह एकूण 1,87,120/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विदेशी दारूची अवैध विक्री/व्यवसाय करणारे वरील इसमाविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2023 ,कलम 124 म.पो. का. व कलम 81, 83, 65(अ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
वर नमूद दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला माला विषयक व शरीराविषयी गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे मिळालेला विदेशी दारूचा साठा बाबत माहिती घेतली असता विदेशी दारूचा साठा नमूद आरोपींनी पोलीस ठाणे निलंगा हद्दीतील निलंगा ते औराद शहाजानी जाणारे आणि रोडवरील हॉटेल गारवा बार मध्ये दिनांक 11 जानेवारी ते 12 जानेवारीच्या मध्यरात्री चोरी करून मिळवलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने केले दुसऱ्या पथकाने पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावरील कारवाईत इसम नामे
1) विष्णू शंकर अंतरेड्डी, वय 36 वर्ष, राहणार भवानीनगर,औराद शहाजानी, तालुका निलंगा.
याच्याकडून विनापरवाना बेकायदेशीर रित्या अवैध चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी बाळगलेले देशी दारू च्या बाटल्या व इतर मुद्देमाल ज्याची किंमत 17,370/- असा जप्त करण्यात आला असून नमूद इसमा विरुद्ध पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास औराद शहाजानी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनी सचिन द्रोणाचार्य,,पोउपनी शैलेश जाधव,सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलिस अमलदार राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नवनाथ हासबे, प्रमोद तरडे, तुराब पठाण यांनी केली आहे.