Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वरून अवघ्या दहा दिवसात अवैध धंद्याविरुद्ध विरुद्ध 27 गुन्हे दाखल.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
      मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वरून अवघ्या दहा दिवसात अवैध धंद्याविरुद्ध विरुद्ध 27 गुन्हे दाखल.





       लातूर-         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याचे लातूर जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संपूर्ण लातूर जिल्हा पोलीस दलाला दिलेले आहेत. शिवाय अवैध धंद्याविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकाकडे तक्रार अथवा अवैध धंद्याची माहिती देण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी स्वतःचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. 
           सदरच्या मोबाईल वरून प्राप्त होणाऱ्या माहिती व तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे पथक थेट पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट करणार आहे.
          दिनांक 09/01/2023 ते 19/01/2023 अवघ्या दहा दिवसात सदर मोबाईल नंबर वरून मिळालेल्या माहिती व तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दहा दिवसात 47 लोकाविरुद्ध 27 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आलेला आहे.
यामध्ये अवैध दारू विक्री-15, जुगार-09, गांजा विक्री-01, हातभट्टी 01, प्रतिबंधित मांजा विक्री-01,इत्यादी प्रकारच्या अवैद्य धंद्यावर केलेल्या कारवाईचा समावेश आहे.
              सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकाने केली आहे.
          पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम यानंतरही चालू राहणार असून पोलीस अधीक्षकांनी उपलब्ध करून दिलेला मोबाईल क्रमांक 8275000778 यावर नागरिक अवैध धंद्याविरुद्धची माहिती अथवा तक्रार मेसेज किंवा व्हाट्सअप करून देऊ शकतात. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अवैध धंद्याविरुद्धची माहिती निर्भयपणे मेसेज अथवा व्हाट्सअप द्वारे द्यावी. पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन तक्रारीची खातरजमा करून गुन्हेगाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post