Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभ बुलडोझने उखडून टाका म्हणार्‍या करणी सेनेच्या अजयसिंग सेंगरला त्वरीत अटक करा

888
भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभ बुलडोझने उखडून टाका म्हणार्‍या करणी सेनेच्या अजयसिंग सेंगरला त्वरीत अटक करा
- अंबेडकरी जनतेची मागणी

लातूर,दि.१ - करणी सेना कार्यकर्ता अजयसिंग सेंगर राहणार खांदा कॉलनी नवी पनवेल नवी मुंबई याने पुर्वाआश्रमीचे महार व सध्याचे बौद्ध समाजाची बदनामी केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्यावतीने गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे अजयसिंग सेंगर करणी सेना कार्यकर्ता या व्यक्तीच्या विरोधात त्वरीत गुन्हा दाखल करून अटक करावे याकरीता तक्रार करण्यात आली आहे.
आधीक माहिती अशी की, करणी सेनाचा कार्यकर्ता अजयसिंग सेंगर यांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला बुलडोझर लावून उखडून टाकू असे समाज विघातक वक्तव्य करून देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. इंग्रजाकडून लढलेल्या सन १८१८ साली झालेल्या युद्धामध्ये महार शुर सैनिकांना गद्दार भारतीयांचा उदो उदो नको म्हणून दरवर्षी १ जानेवारी रोजी आयोजित शौर्य दिनाला विरोध केला जातो. गद्दारांचा सन्मान होता कामा नये असे वक्तव्य केले आहे. अजयसिंग सेंगर यांच्या कृतीमुळे व वक्तव्यामुळे आंबेडकरी अनुयामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सामाजीक सलोखा व शांतता भंग झाली आहे. कोरेगाव भिमा येथील विजय स्तंभ हा शुरविर महार सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक असून विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दरवर्षी १ जानेवारीला जात होते. त्यामुळे या विजय स्तांभास लोखो अनुयायी अभिवादनास आजही जातात समस्त आंबेडकरी समाजासाठी अजयसिंग सेंगर यांने बदनामीकारक वक्तव्य केले असून ते सामटीव्ही चॅनेलवर प्रदेर्शीत केले असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे समाजात तणाव निर्माण होवून सामाजीक दंगली भडकविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजसिंग सेंगर याच्यावर भावना भडकवीने, समाजाता दंगल घडवून आण्यासाठी बदनामी वक्तव्य करणे व आंबेडकरी अनुयाच्याविरूद्ध बदनामीकारक वक्तव्य करणे यासाठी त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा अशी तक्रार गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे रिपाई प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनंत लांडगे, ज्येष्ठ नेते मोहन माने, ऍड. राजकुमार गंडले, माजी नगरसेवक आशोक कांबळे, विजयकुमार श्रृंगारे, राष्ट्रीय विकास संघाचे अध्यक्ष बी. एम. कांबळे, पत्रकार उत्तम भालेराव, महेश बानाटे, बी.एल. वाघमारे आदिंनी तक्रार दाखल केली आहे.
888
Previous Post Next Post