Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये वारद मेडिकलला आग...दुकान जळून खाक


 लातूरमध्ये वारद मेडिकलला आग...दुकान जळून खाक





लातूर : प्रतिनिधी

लातूर मध्ये वारद मेडिकलला आग लागून दुकान जळून खाक झाल्याचे धक्कादायक घटना घडली असुन हि आग मंगळवारी रात्री उशीरा लागल्याची समोर येत आहे.अग्निशामन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून आग विझवण्याचे काम करत होते.हि आग ईतकी भयंकर होती की आगीमध्ये दुकान जळून खाक झाल्याचे चित्र दिसत आहेत.या आगीमुळे वारद मेडिकल चे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील जिल्ह्यांतही सुप्रसिद्ध असलेल्या येथील महात्मा गांधी चौकातील वारद मेडिकलला दि. २४जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मेडिकल दुकान जळून खाक झाले. या आगीने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.या आगी मध्ये ॵषधे, फ्रीज,कॉम्प्युटर,टेबल,खुर्च्या अक्षरशः जऴून खाक झाल्याचे चित्र दिसत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच लातूर शहर महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने दुकानाचा वरचा मजला आगीपासून वाचविण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख सुभाष कदम यांनी सांगितले. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाजही कदम यांनी व्यक्त केला आहे. Ads by Eonads
Previous Post Next Post