गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात !
लातूर दि. 12- बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील एआयबीईएशी संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनिअन औरमगाबाद या बँक कर्मचारी संघटनाने दिलेल्या हाकेनुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी दिनांक १६ जानेवारी रोजी व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने ५० वर्षांपासून संघटनांकडे असलेली कार्यालये जबरदस्तीने हस्तगत केली आहेत त्याच्या विरोधात एक दिवसाच्या निषेध संपाची हाक दिली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरातील महाबँक कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस समोर निदर्शने केली.
या शिवाय बँकेतील सर्व संघटनांनी मिळून स्थापन करण्यात आलेल्या युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनस च्या वतीने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी नोकर भरती, कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नांवर द्विपक्षीय वाटाघाटीतून निर्णय, मनमानी प्रशासकीय बदल्यांना विरोध इत्यादी मागण्यांसाठी २७ जानेवारी आणि ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपाची हाक दिली आहे. बॅक तोट्यात होती तेंव्हा कर्मचारी वर्गाने सर्वस्व अर्पण करत बॅंकेला सुस्थितीत आणले, करोना काळात जीवावर उदार होऊन ग्राहकांना सेवा दिल्या पण व्यवस्थापन याची जाणीव न ठेवता कर्मचारी वर्गावर विविध पद्धतीने दबाव आणत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढत आहे. कर्मचारी वर्गाला सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागत आहे. रोज बँकेत जास्त वेळ बसावे लागत आहे. यामुळे काम आणि घर यातील समतोल ढळला आहे. यामुळे कर्मचारी वर्ग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष आहे हे लक्षात घेता महा बॅंकेतील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जर व्यवस्थापनाने यांची दखल घेऊन सन्माननीय तडजोड केली नाही तर आंदोलनकारी कर्मचारी मार्च महिन्यात बेमुदत संपावर जातील असा इशारा युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनिअन्स च्या वतीने दिला.