गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह अटक.
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..... दोन माली गुन्हे उघडकीस 43000 रुपयांचा मुद्देमाल जप्त*..
लातूर - या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, गेली चार महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून मारहाण करून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 400/2022, कलम 394, 506,34 भा द वि (गंभीर दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दिनांक 15/01/2023 रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे
1) अंकुश तानाजी जाधव, वय 21 वर्ष राहणार कोल्हे नगर लातूर.
यास त्याच्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चार महिन्यापूर्वी लातूर शहरात एका मोटारसायकल स्वारास मारहाण करून, त्याचा मोबाईल आणखीन दोन साथीदार नामे
2) सुशील रमेश कांबळे राहणार कोल्हे नगर लातूर
3) विश्वजीत अभिमन्यू देवकते, राहणार कापूर तालुका जिल्हा लातूर
अशा तिघांनी मिळून जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील आरोपी अंकुश जाधव याने गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि गुन्हे करताना वापरलेली ज्युपिटर गाडी असा एकूण 41000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .
त्यावरून नमूद आरोपी अंकुश जाधव यास मुद्देमालसह मधून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत.
गुन्हयातील इतर दोन आरोपी आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
***** तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने आणखीन एक कामगिरी करत पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 17/2023 कलम 379 भादवी मधील शेतातील बोर मोटार स्टार्टर्स चोरलेला आरोपी नामे
1) सोमनाथ शामराव सुळके, वय 27 वर्ष, राहणार भातखेडा तालुका जिल्हा लातूर.
दिनांक 14/01/2023 रोजी मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, राजू मस्के, जमीर शेख, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नकुल पाटील यांनी केली आहे